
हरीदास गोपळघरे यांनी खर्डा गणातून निवडणुक लढवावी, कार्यकर्त्यांची मागणी
जामखेड प्रतिनिधी
सभापती प्रा राम शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे व एकनिष्ठ भगवान कृपा दुधसंघाचे चेअरमन हरिदास गोपाळघरे यांनी येणाऱ्या पंचायत समिती निवडणूकीत खर्डा पंचायत समिती गणातुन निवडणूक लढवावी अशी मागणी युवक कार्यकर्त्यांनकडुन होत आहे.

हरिदास गोपाळघरे हे भगवान कृपा दुधसंघाचे चेअरमन असुन सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. गेल्या पंधरा वर्षांपासून ते भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. सभापती प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी नागोबाचीवाडी या गावासाठी सभामंडप, तलाव, बंधारे व घरकुल मंजुरी यासाठी मोठ्या प्रमाणात नीधी आणला आहे. सामाजिक व राजकीय कामाच्या माध्यमातून सतत लोकांबरोबर संपर्कात राहून आनेक जनहिताची कामे केली आहेत. त्यामुळे हरिदास गोपाळघरे हे आगामी खर्डा गणात खर्डा गणातून पंचायत समिती निवडणूक लढवावी अशी मागणी युवक कार्यकर्त्यांन कडुन होत आहे.

सभापती नामदार प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून खर्डा गटात व गणात आलेल्या सिद्ध संत सिताराम बाबा गड या ठिकाणी देखील विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा नीधी दिला आहे. तसेच खर्डा शहर व आसपास च्या गावामध्ये नामदार शिंदे साहेब यांनी दिलेल्या विविध विकास कामांचा उपयोग आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत महायुतीला होणार असुन या सर्व बाबींचा विचार करून भारतीय जनता पार्टी चा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून हरिदास गोपाळघरे यांना भारतीय जनता पार्टीने खर्डा गणातून पंचायत समितीसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी खर्डा शहरासह गावागावातुन मागणी होत आहे.
चौकट
खर्डा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच मा श्री एकनाथ आबा गोपाळघरे यांचे सुपुत्र असून या गणातून प्रबळ दावेदार समजले जात आहेत.







