

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचा प्रारूप आाराखडा उद्या सोमवारी दि १४ जुलै रोजी होणार प्रसिद्ध
जामखेड तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट तर पंचायत समितीचे दोन गण वाढणार
जामखेड प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण रचनांचा प्रारूप आराखडा उद्या सोमवारी दि १४ जुलै २०२५ रोजी जाहीर होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, १४ तहसीलकार्यालय, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या कार्यालयात हा प्रारूप आराखडा राजपत्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे. कर्जत आणि जामखेड तालुक्यात जिल्हापरिषदेचा प्रत्येकी एक, तर पंचायत समितीचे दोन गण वाढणार आहेत.

आयोगाने पंचायत समित्याच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. जिल्हा गट आणि पंचायत समिती गणाची प्रभागरचना जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर नव्याने आरक्षणाची प्रक्रिया राबवण्यात येणार असून, २०२२ च्या जिल्हा परिषद पंचायत समितीअधिनियमातील दुरुस्तीनुसार प्रत्येक जिल्हयात जिल्हा परिषदेचे जास्तीत-जास्त ७५, तर कमीत कमी ५० गट राहणार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात हे गट निश्चित करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात पूर्वी जिल्हा परिषदेचे ७३ गट, तर पंचायत समितीचे १४६ गण होते. नवीन तरतुदी नुसार जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी ७५, तर पंचायत समितीसाठी १५० गण राहणार आहेत. कर्जत आणि जामखेड तालुक्यात जिल्हापरिषदेचा प्रत्येकी एक, तर पंचायतसमितीचे दोन गण वाढणार आहेत.

प्रभाग रचना कार्यक्रम खालील प्रमाणे
दि १४ जुलैला प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध होणार
दि २१ जुलैपर्यंत जिल्हाधिकान्यांकडे हरकती व सूचना सादर करणे.
दि २८ जुलैपर्यंत हरकती अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना सादर केल्याजाणार आहेत
दि ११ ऑगस्टपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊननिर्णय घेणे.
दि १८ ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना मान्यतिसाठी राज्य निवडणूक आयोगकिंवा प्राधिकृत केलेल्या अधिकान्यांकडे सादर करणे.






