

युवा उद्योजक व सरपंच सागर कोल्हे यांच्याकडून साकत गटातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
जामखेड प्रतिनिधी
युवा उद्योजक तसेच राजुरीचे सरपंच सागर कोल्हे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत देशाची युवा पिढी सक्षम व्हावी यासाठी साकत गटातील जिल्हा परिषद तसेच काही माध्यमिक विद्यालय व अंगणवाडी अशा सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना हे साहित्य मिळाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून आला.

राजुरीचे सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्याध्यक्ष सागर कोल्हे यांनी आपला वाढदिवस हा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. सामाजिक बांधिलकी जपत सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले. यावेळी प्रत्येक गावातील युवा कार्यकर्त्यांनी एकच मागणी लावून धरली आहे की, आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सागर कोल्हे यांनी साकत गटातून जिल्हा परिषद निवडणुक लढवावी अशी सर्व युवकांची इच्छा आहे. शैक्षणिक साहित्यांचे वाटप करताना अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

राजुरी सरपंच व युवा उद्योजक गुरुदत्त अर्थमूव्हर्सचे संचालक मा सागर भाऊ कोल्हे अगदी गरीब परस्थीतून पुढे आलेला तरुण व्यवसायामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत राजुरी गावामधे ही आपली समाजसेवा करत स्वखर्चातून सार्वजनिक ठिकाणी बाकडे बसवणे तसेच सर्व गावात वाड्या वस्त्या वर पथ दिवे बसवले,
जिल्हा परिषद शाळामध्ये विविध उपक्रम घेत मुलांना शालेय साहित्य वाटप असेल तसेच शाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्रत्येक वर्षी भव्य दिव्य असा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करत आहेत, तसेच या कार्यामध्ये त्यांच्या पत्नी सौ अश्विनी ताई यांचाही मोठा वाट राहत असे तसेच गावामधे सर्व लोकांन सोबत घेऊन मिळून मिसळून काम करत आहेत.

जनतेच्या मनातील सरपंच म्हणून अश्विनी ताई निवडून आल्या, व जनतेतून सरपंच होण्याचा मान मिळाला, राष्टवादीचे युवक कार्यध्यक्षपद ही स्वीकारले व दादाच्या अगदी विश्वासू कार्यकर्ता म्हणून आपली ओळख निर्माण केली.
सरपंच झाल्यावर गावामधे विविध विकास कामाचा धडका लावत गावामधे भूमिगत गटार, सिमेंट रस्ते, पेव्हिग ब्लॉक, शेती मध्ये जाण्यासाठी पाणंद खडीकरण रस्ते असतील असे किती तरी कामे केले हे सर्व काम पाहून त्यांना बारामती येथे शारदा आदर्श सरपंच पुरस्कार ही मिळाला तसेच रोहित दादा व सुनंदा ताई पवार यांनी त्याचे खूप कौतुक केले, तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त साकत जिल्हा परिषद गटातील 5 हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

न्यू इंग्लिश स्कूल राजुरी शाळेवर साहित्य वाटप करताना यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते , रमेश (दादा) आजबे, मंगेश (दादा) आजबे, प्रशांत राळेभात, विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन हरिदास उगलमुगले, व्हाचेअरमन विजय खाडे, विकास (भाऊ) सदाफुले, न्यू इंग्लिश स्कूल राजुरी शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर, सर्व शिक्षक व विद्यार्थी, बाबासाहेब घुले, घुले सर, मोरे भाऊसाहेब, संजय चौभारे, वसीम सय्यद, दादासाहेब ढवळे, संदीप गायकवाड, बाळासाहेब खैरे, नितीन ससाणे, सिद्धेश्वर लटके, पिंटूशेठ इंगोले, यांच्यासह सागर भाऊ मित्र परिवार उपस्थित होते.



