
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत सारोळा जिल्हा परिषद शाळेची यशाची परंपरा कायम.
जामखेड प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा येथील इयत्ता पाचवीच्या वर्गातील एकूण ११ विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक (इ.५वी) शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२५ मध्ये पात्र ठरले असून त्यापैकी समृध्दी अनिल यादव हिने जिल्हा गुणवत्ता शिष्यवृत्ती धारक होण्याचा बहुमान संपादन केला आहे.

या सुयशामुळे समृद्धीला प्रतिवर्षी ५०००/ रू प्रमाणे एकूण १५०००/- शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच सदर परिक्षेत अर्णवी योगेश तुपविहिरे, वैष्णवी अमोल लोहार, ओमराज भरत सांगळे, अनन्या संदिप भवर, यश अमोल कांबळे, अथर्व अण्णा डोके, समर्थ योगेश शेटे, ज्ञानेश्वरी दत्तात्रय डोके, स्वराज श्रीधर मुळे, केतन अशोक काशिद हे विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत.

यासर्व गुणवंत विद्यार्थी यांना मुख्याध्यापक माजीद शेख, वर्गशिक्षक प्रशांत होळकर, मार्गदर्शक शिक्षक सोमाजी मधे, राहुल लिमकर, खंडेराव सोळंके, शबाना शेख व अमृता रसाळ यांचे मार्गदर्शन लाभले. इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परिक्षेतील उत्तुंग कामगिरी बद्दल सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक सर्व शिक्षक वृंदांचे, जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव, साहेब गटशिक्षणाधिकारी प्रदिप चव्हाण जामखेड बीट शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ साहेब, केंद्रप्रमुख सुरेश मोहिते तसेच सारोळा गावच्या सरपंच रितूताई काशिद, अजयदादा काशिद, उपसरपंच हर्षद मुळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर सातपुते, उपाध्यक्ष राजेंद्र आजबे, पालक व ग्रामस्थ यांनी हार्दिक अभिनंदन करुन भविष्यातील उज्ज्वल शैक्षणिक वाटचाली करिता मनस्वी शुभेच्छा दिल्या.



