

मुलांची आवड हेच मुलांचे करीयर होऊ शकते – विष्णु घुगे
जामखेड येथे विद्यार्थी व पालकांसाठी मोफत मार्गदर्शन संपन्न
जामखेड प्रतिनिधी
पालकांना मुलांची क्षमता व मुलगा पुढे काय होऊ शकतो हे समजले पाहिजे. मोठ्या इन्स्टिटय़ूटला एडमीशन घेतले म्हणजे मुलगा डॉक्टर व इंजिनिअर होतो असे नाही. स्पर्धेत उतरायचे आसेल तर विद्यार्थींना स्पर्धा माहिती असली पाहिजे. तसेच पालकांना विद्यार्थ्यांन बाबत स्पर्धापरीक्षेची जाणीव व जागरूकता असली पाहिजे असे मत प्रमुख मार्गदर्शक संचालक- दि ब्रेनस्मिथस् कन्सल्टन्सी चे विष्णु घुगे सर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

जामखेड येथील व्हिजन ॲकॅडमीच्या वतीने विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या साठी मोफत मार्गदर्शन शिबीर व जनरल नॉलेज परीक्षेचा बक्षिस वितरण सोहळा, नुकताच शनिवार दि 5 जुलै रोजी सायंकाळी महावीर मंगल कार्यालय जामखेड याठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक संचालक- दि ब्रेनस्मिथस् कन्सल्टन्सी चे विष्णु घुगे सर यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित शिक्षक संदीप पवार सर हे होते तर प्रमुख उपस्थितीत समावेशित शिक्षण विभाग प्रामुख, अंबेजोगाईचे प्रकाश हरिश्चंद्र शिंदे, लातूर जिल्हा शिक्षण अधिकारी माननीय नागनाथ शिंदे, आदर्श शिक्षक जिल्हा परिषद बीड, रमेश पवार सर, ॲड. बंकटराव बारवकर, व्हीजन ॲकॅडमीचे संचालक धिरज नागनाथ शिंदे, सुरेश घुगे, जाकीर शेख सर, अशोक यादव, आदर्श शिक्षक केशव कोल्हे, एकनाथ चव्हाण सर सह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना मार्गदर्शक विष्णु घुगे म्हणाले की विद्यार्थ्यांना स्पर्धेत उतरायचे असेल तर फौंडेशन काय आहे ते समजले पाहिजे. पालक दहावी व बारावी नंतर नीट NEET व JEE चे क्लास लावतात. यावेळी विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ होते. त्यामुळे विद्यार्थींना आठवी पासुनच फौंडेशन हे महत्वाचे आहे. ज्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करीयर करायचे आहे त्याची संपुर्ण माहिती ही पालकांना आसने गरजेचे आहे. मुलांची क्षमता कीती आहे यावर मुलांचे करीयर निवडणे महत्त्वाचे आहे. डॉक्टर आणि इंजिनिअरिंग म्हणजे मुलांचे करीयर नाही, मुलांची आवड हे मुलांचे करीयर होऊ शकते. मुलांना सय्यम, शिस्त शिकवा व आर्थिक परिस्थितीची जाणीव करुन द्या म्हणजे मुलगा नक्कीच करीयर मध्ये यशस्वी होईल.

शिक्षणाच्या संधी प्राप्त करायच्या असतील तर शिक्षणाची गती पकडायला पाहिजे, आजचा काळ स्पर्धेचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाचवी सहावी पासुनच फौडेशन चा अभ्यास महत्त्वाचा आहे. जामखेड सारख्या ठिकाणी व्हीजन ॲकॅडमी ने विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे व्हिजन ॲकॅडमीच्या फौंडेशनचा अभ्यासक्रम हा राष्ट्रीय पातळीवर च्या तज्ञ शिक्षकांन कडुन बनवला आहे. तसेच आम्ही अधिक गुणवत्ता देण्याचा प्रयत्न करणार आहोत असे जामखेडचे व सध्या लातूर जिल्हा शिक्षण अधिकारी असलेले नागनाथ शिंदे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन व्हिजन अकॅडमी जामखेड चे संचालक धीरज शिंदे सर व शाखा व्यवस्थापक उमेश घुगे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हनुमंत निकम व संतोष सरसमकर सर यांनी केले.



