Home राजकारण कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास...

कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल

कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल

आ. रोहित पवार यांना जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धक्का.

जामखेड प्रतिनिधी

कृषी उत्पन्न बाजार समितीचे आ. रोहीत पवार गटाचे उपसभापती कैलास वराट यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. यामुळे कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार यांना जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धक्का बसला आहे.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आ. रोहित पवार गटाचे नऊ व सभापती नामदार प्रा राम शिंदे साहेब यांचे नऊ संचालक निवडून आलेले असताना मागील वेळी ईश्वर चिट्ठीने भारतीय जनता पार्टीचा विजय झाला होता. विजयाच्या रूपाने शरद पंडित कार्ले हे सभापती पदी विराजमान झाले होते व उपसभापती पदी आ. रोहित पवार गटाचे कैलास वराट यांची निवड झालेली होती.

परंतु मागील दोन वर्षांमध्ये आ. रोहित पवार गटाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वेळोवेळी विकास कामांना अडथळे आणल्यामुळे आ. रोहित पवार गटाचे तीन संचालक अंकुश ढवळे, राहुल बेदमुथा व नारायण जायभाय यांनी जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सभापती नामदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला व आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांच्याकडे उपसभापती यांच्यावर 18 पैकी 12 संचालकांनी सह्या करून अविश्वास ठराव दाखल केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!