Home ताज्या बातम्या श्री संत वामनभाऊ महाराज पालखीचे नगरसेविका राजश्रीताई मोहन पवार यांच्या वतीने स्वागत

श्री संत वामनभाऊ महाराज पालखीचे नगरसेविका राजश्रीताई मोहन पवार यांच्या वतीने स्वागत

श्री संत वामनभाऊ महाराज पालखीचे नगरसेविका राजश्रीताई मोहन पवार यांच्या वतीने स्वागत

जामखेड प्रतिनिधी – दि.२७ जून

श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे जामखेड शहरातील तपनेश्वर येथे मोठ्या भक्तिभावात आणि उत्साही वातावरणात आगमन झाले. यावेळी पालखी सोहळ्यानिमित्त आलेल्या वारकऱ्यांचे जामखेड नगर परिषद बांधकाम विभागाच्या सभापती तथा नगरसेविका सौ. राजश्रीताई मोहन (वस्ताद) पवार मित्र परिवाराच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. तसेच वारकऱ्यांसाठी फराळाचे वाटप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी सभापती प्रा.राम शिंदे बोलताना म्हणाले की वर्षानुवर्षांची परंपरा जपत श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखी व दिंडीचे शहरात भव्य स्वागत करताना मला आनंद वाटतो. नगरसेविका राजश्रीताई मोहन पवार यांच्या वतीने वारकऱ्यांना फराळ वाटप करण्यात आले. राज्य शासनाने रेनकोट व विविध सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असून, सर्व यंत्रणा सतर्कपणे काम करत आहेत. तसेच शेतकरी सुखावला असून, यंदा वारकरी व शेतकऱ्यांची संख्या रेकॉर्डब्रेक आहे. शेतकऱ्यांवर कोणतेही संकट येऊ नये अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले.

याप्रसंगी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, माजी सभापती रवि सुरवसे, मनोज कुलकर्णी, प्रविण चोरडिया, भाजप शहरमंडल अध्यक्ष संजय काशिद, तालुका अध्यक्ष बापूराव ढवळे, डॉ. संजय भोरे,माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, पवन राळेभात, मोहन (मामा) गडदे, अमित जाधव, नवनाथ सुरवसे (गुरुजी), विक्रांत घायतडक, सुरज काळे तसेच तपनेश्वर हनुमान मंदिर समितीचे संचालक गणेश मासाळ, डॉ. अशोक बांगर, डॉ. प्रकाश कारंडे, उद्योजक लहुशेठ पवार, उमेश माळवदकर, रमेश धोत्रे, राजेंद्र शेलार, सुरज पवार, अर्थराज गायकवाड, दशरथ बिरंगळ यांच्यासह विविध भजनी मंडळे, भाविक आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली ही पालखी, मठाधिपती महंत श्री विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे भाविकांच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा वारसा जपत पुढे सरसावली.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!