जामखेड गोळीबारातील सहा आरोपी जेरबंद, पिस्टल सह दोन चारचाकी वहान केले जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरात काल झालेल्या गोळीबारातील आरोपींना अवघ्या 24 तासात अटक करण्यात आहिल्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे. या प्रकरणी एकूण 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे जामखेड शहरात एकच खळबळ उडाली होती तर व्यापार्यांनी जामखेड बंद ठेवण्याचा देखील इशारा दिला होता.
प्रभू रायभान भालेकर, वय 30 रा. निपाणी, छत्रपती संभाजीनगर, नकुल विष्णू मुळे, वय 40, रा. खेर्डा, तालुका पैठण, शरद अंकुशराव शिंदे, वय 38 रा. पुसेगाव तालुका पैठण, गणेश गोविंद आरगडे, वय 30, रा. खंडाळा तालुका पैठण, रावबहादुर श्रीधर हारकळ वय 35 रा. सारासिद्धी सोसायटी, बीड बायपास, छत्रपती संभाजी नगर व सुशील ताराचंद गांगवे वय 30, रा. पद्मापुरा, छत्रपती संभाजीनगर अशा एकूण अटक करण्यात आलेल्या 6 आरोपींची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की काल जामखेड शहरातील विंचरणा नदीच्या जवळ जखमी कुणाल खंडु पवार हा आरोपींना म्हणाला की येथे लघुशंका करू नका या कारणावरून झालेल्या वादावादी मध्ये आरोपींनी या ठिकाणी कुणाल पवार यास लाथाबुक्क्याने मारहाण केली व गोळीबार करत त्यास गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी जामखेड शहरात गोळीबार घडल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती यानुसार दिनांक 2 जून 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा माग काढत व गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचे आरोपी हे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. तसेच ते नेवासा तालुक्यातील प्रवारासंगम या मार्गाने आपल्या चार चाकी वाहनातून जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्या अनुषंगाने पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत प्रवारासंगम येथे सापळा असून एकूण वरील सहा आरोपींना जेरबंद केले आहे.
तसेच या आरोपींकडून चार चाकी वाहन क्रमांक एम एच 20 एफ. पी 66 22 व दुसरे वाहन एम एच 20 जी. के 5586 हे जप्त केले असून गोळीबार करणारा आरोपी प्रभू रायभान भालेकर याने गुन्ह्यात वापरलेल्या लायसनचे पिस्टल मधिल एक राऊंड व दोन रिकाम्या पुंगळ्या असा मुद्देमाल जप्त केला. तसेच त्याला याबाबत विश्वासात घेऊन विचारले असता त्याने माहिती दिली की आम्ही सर्वजण भूम तालुक्यात आपल्या मित्राच्या वाढदिवसा निमित्त गेले होते व वाढदिवस झाल्यानंतर ते जामखेड मार्गे छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी चालले होते. यावेळी जामखेड या ठिकाणी ही गोळीबाराची घटना घडली असल्याचे सांगितले. तसेच आरोपीकडील शस्त्र प्रवारा असलेले पिस्टल मधून फायरिंग केल्याची माहिती दिली. याबाबत आरोपींकडून मुद्देमाल जप्त करून जामखेड पोलीस स्टेशनला सर्व आरोपींना हजर करण्यात येणार आसुन पुढील गुन्ह्यांचा तपास जामखेड पोलीस करणार आहेत अशी ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, कर्जत चे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि हेमंत थोरात, पोसई अनंत सालगुडे, व पोलीस अंमलदार अतुल लोटके, शाहीद शेख, संदीप दरंदले, रोहित येमुल, किशोर शिरसाठ, गणेश धोत्रे, संतोष लोढे, फुरकान शेख, विजय ठोंबरे, सागर ससाणे, अमृत आढाव, रोहित मिसाळ, प्रशांत राठोड, भगवान मुळे यांच्या पथकाने केली आहे.