Home ताज्या बातम्या ऍनिमियाला झुंज देणाऱ्या जामखेड तालुक्यातील मोहा येथील १० वर्षाच्या मुलीला हवाय मदतीचा...
ऍनिमियाला झुंज देणाऱ्या जामखेड तालुक्यातील मोहा येथील १० वर्षाच्या मुलीला हवाय मदतीचा हात,
माझ्या बाळाचा जीव वाचवा एका आईची ना.प्रा.राम शिंदे व आ.रोहित पवार यांना भावनिक हाक
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील मोहा येथील परिस्थितीने गरीब, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ कसाबसा चालवणाऱ्या प्रशांत गायकवाड यांच्या अवघ्या दहा वर्षाची चिमुरडी तन्वी हिला प्लास्टिक ऍनिमिया या आजाराचे निदान झाले. तन्वीची अचानक प्रकृती खालवल्याने जामखेड येथील स्थानिक खाजगी हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली.
उपचाराला साथ मिळत नसल्याने तिला जिल्हा अहिल्यानगर – येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. पण तिथे ही सरकारी डॉक्टरांनी त्यांना पुण्याला जाण्याचा सांगितले. मग कुटूंबीयांनी ईलाजाकरिता पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये नेले तिथे डॉक्टरांच्या तपासणी दरम्यान तिला प्लास्टिक ऍनिमिया झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्लास्टिक ॲनिमिया हा एक रोग आहे जो जेव्हा अस्थिमज्जाच्या स्टेम पेशी शरीरातील पुरेशा पेशी व प्लेटलेट्स तयार करण्यात अयशस्वी ठरतो तेव्हा तो होतो. त्यामध्ये नाकावाटे रक्त येणे, ताप येणे व तसेच शरीरात स्टेम सेल्स तयार करणारे बोन मॅरो निकामी होतो, तो बदलावा लागतो .
मुलीची आजी संगीता गायकवाड यांनी बोलताना सांगितले की आम्ही गरीब कुटुंबातील व जामखेड मतदार संघातील मोहा येथील आहोत व माझा मुलगा प्रशांत गायकवाड हा मोलमजुरी करून कुटुंब चालवत असल्याने सर्व कुटुंब हे त्यांच्यावर अवलंबून आहे. व पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये तन्वीचे उपचार करण्यात करिता डॉक्टरांनी तीस लाख रुपये लागतील असे सांगितले आहे व हे ऐकून आमच्या पायाखालील जमीन सरकली आहे. आमची परिस्थिती खूप गरीब आसल्याने आम्हाला उपचारासाठी पुणे येथे तन्वीला घेऊन जाता येत नाही. अशावेळी मुलीवर ओढवलेल्या प्रसंगामुळे पूर्णतः कोलमडून गेले आहेत. तन्वी वर उपचार हे पुणे हॉस्पिटलमध्ये करण्यासाठी हॉस्पिटल तसेच बाहेरील लागणारी महागडी इंजेक्शन, गोळ्या, औषधे हे त्यांच्या आवाक्या बाहेरील आहेत. परिस्थिती पुढे हतबल झालेल्या, रुग्ण मुलीच्या आजीने व आई वडिलांनी महागाड्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने “माझ्या बाळाचा जीव वाचवा” अशी कर्जत-जामखेडचे लोकप्रतिनिधी असणारे नामदार प्रा. राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्याकडे मदतीची भावनिक हाक रुग्ण तन्वीच्या आजी व आई वडिलांनी केली आहे. आपल्या कुटुंबासाठी अनेक स्वप्ने पाहिलेल्या प्रशांत गायकवाड यांच्या मुलीवर ओढवलेला प्रसंग, आणि आपल्या लाडक्या लेकीसाठी होत असलेली बापाची घालमेल खरंच मन हेलावणारी आहे.
चौकट
मदतीसाठी कुटुंबाची ना प्रा.राम शिंदे व आमदार रोहित पवार यांना भावनिक हाक, तुमचा एक मदतीचा हात जो देईल एका गरिबाला साथ….
तन्वी वरील महागडे उपचार आणि तेथील राहण्याचा खर्च हे मोलमजुरी करणाऱ्या गायकवाड कुटुंबाला शक्य नाही सुरुवातीला होणारा खर्च जामखेड तालुक्यातील मोहा, हापटवाडी, रेडेवाडी, नानेवाडी येथील स्थानिकांनी निधी गोळा करत केला आहे. तन्वी हिच्यावरील दीर्घ उपचारासाठी पुणे येथे राहणे आवश्यक आहे. असे असताना गायकवाड कुटूंबाचे कोणतेही नातेवाईक त्या भागात नसल्याने त्याना जागा भाड्याने घेऊन राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. उपचारासाठी आणि आणि राहण्याची सोय होण्यासाठी आर्थिक मदत उभी राहणे आवश्यक आहे. अशातच जामखेडचे लोकप्रतिनिधी असल्या नात्याने आमदार रोहित पवार व नामदार प्रा.राम शिंदे यांनी या गरीब कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी नागरिकांमधून चर्चा होत आहे.
तसेच फेसबुक, व्हाट्सअप ग्रुप, आपले मित्रमंडळी, नातेवाईक, दानशूर संघटना यांच्या माध्यमातून आपल्या परीने जमेल तशी मदत करून कु. तन्वी प्रशांत गायकवाड या मुलीला उपचारार देऊन आजारातून लवकरात लवकर बरी होण्यासाठी माणुसकीच्या नात्याने आपल्याला जमेल तसा हातभार लावावा असे आपणास आवाहन साप्ताहिक पोलीस वारंटच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मदत खाली दिलेल्या बँक खाते किंवा फोन पे क्रमांकावर पाठवावी.
बँक तपशील
नाव :- प्रशांत भीमराव गायकवाड
बँकेचे नाव :- सेंट्रल बँक
शाखा : जामखेड
आय एफ एस सी कोड – C B I NO 281004
खाते क्रमांक – 3572380465
फोन पे क्रमांक – 9503310987
प्रशांत गायकवाड मो.नं- 9503310987
error: Content is protected !!