Home ताज्या बातम्या मराठा आंदोलक, सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ उद्या जामखेड येथे...
मराठा आंदोलक, सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ उद्या जामखेड येथे निवेदन देण्यात येणार
मराठा बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहाण्याचे आवहान
जामखेड प्रतिनिधी
मराठा आंदोलक, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ उद्या शुक्रवार दिनांक १३ डीसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता जामखेड तहसीलदार यांना अखंड मराठा समाज जामखेड तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी बहुसंख्येने उपस्थित रहाण्याचे आवहान करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे मराठा आंदोलक व सरपंच संतोष देशमुख यांचं सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख यांचं आधी अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. मात्र, अपहरण झाल्याच्या काही तासानंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला होता.
या घटनेनंतर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी भेट देऊन मस्साजोग गावच्या नागरिकांशी संवाद साधला. तसेच माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत आरोपींवर तातडीने कारवाईची मागणी केली आहे. तसेच तुम्ही आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर जड जाईल, असं म्हणत मनोज जरांगे यांनी इशारा दिला होता.
याच अनुषंगाने जामखेड येथे देखील या घटनेच्या निषेधार्थ अखंड मराठा समाज जामखेड तालुक्याच्या वतीने देखील उद्या दि शुक्रवार दि 13 डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी जामखेड तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी बहुसंख्येने सकाळी दहा वाजता बीड काॅर्नर येथे उपस्थित रहाण्याचे आवहान अखंड मराठा समाज जामखेड तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.
error: Content is protected !!