राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात बुधवारी मतदान प्रक्रिया शांततेमध्ये सुरू झाले. उत्साही मतदारांनी सकाळी मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यास प्राधान्य दिले. दुपारी तीन वाजेपर्यंत ५१% मतदान झाले होते. अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागलेल्या दिसून आल्या. तरुण मतदारांनी पहिल्यांदाच मतदान केल्याने मतदान केल्याचे कर्तव्य बोट दाखवून सेल्फी काढताना दिसून आले. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत काही ठिकाणी मतदान सुरू असल्याने एकुण आकडेवारी येण्यास विलंब झाला होता दरम्यान रात्री उशिरा आलेल्या आकडेवारी नुसार कर्जत जामखेड तालुक्यात 75.15 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान वाढलेली टक्केवारी कोणाच्या पदरात पडते याकडे नागरिकाचे लक्ष लागले आहे. तसेच जामखेड शहरातील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा व नागेश विद्यालय येथे आदर्श केंद्रात गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात शांततेत मतदान प्रक्रिया सुरु असून दुपारी ३ वाजेपर्यंत ५१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.सकाळी ७ वाजता गुलाबी थंडीत विधानसभा मतदार संघातील गावांमध्ये मतदानाला सुरूवात झाली. मात्र, सकाळच्या सत्रात मतदान जोराने सुरु झाले होते. त्यानंतर दुपारी धिम्या गतीने सुरू होऊन दुपारी ४ नंतर मतदारांनी विविध मतदान केंद्रावर एकच गर्दी केली होती .
सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत मतदार संघात १५ हजार ६१७ पुरूष तर ६ हजार ४1७ महिला अशा एकूण २२ हजार ३४ मतदारांचे ६. ३४ टक्के मतदान झाले. त्यानंतर ९ वाजेनतंर मतदानाची गती कासवगतीने वाढू लागली.सकाळी ११ वाजेपर्यंत २०.७८ टक्के म्हणजे ७२ हजार १६४ इतके मतदान झाले. त्यामध्ये ४३ हजार ५०४ पुरूष तर २८ हजार ६६० महिलांचा समावेश होता. तर दुपारी १ वाजे पर्यंत ३६.२९ टक्केवारीत १ लाख २६ हजार ४० मतदारांनी मतदान केले. यामध्ये ६८ हजार ४३५ पुरूष तर ५७ हजार ६०५ महिला मतदारांनी मतदानाचा हक्त बजावला. दुपारी ३ वाजेपर्यंत विधानसभा मतदार संघात ५१. १६ टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण १ लाख ७१ हजार ६७१ मतदारांनी मतदान केले. यात ९२ हजार ५०९ पुरुष तर ८५ हजार १६२ मतदार होते. तर पाच वाजेपयंत ६६.५० टक्केवारीत २ लाख ३० हजार ९६९ मतदारांनी मतदान केले. यामध्ये १ लाख १९ हजार ८६४ पुरूष तर १ लाख ११ हजार १०५ महिला मतदारांनी मतदानाचा हक्त बजावला. तर सायंकाळी ६ वाजल्यानंतरही जामखेड तालुक्यातील काही गावात मतदान सुरू होते त्यामुळे फायनल आकडेवारी येण्यास विलंब झाला होता मतदार संघात ७५.१५ टक्के मतदान झाले दरम्यान शहर तसेच ग्रामीण भागात येथे ज्येष्ठ नागरिकांनी मतदान करण्यासाठी रांग लावली होती. महायुतीचे उमेदवार राम शिंदे व महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांनी विविध ठिकाणी मतदान केंद्रावर जात भेटी दिल्या.
दरम्यान जामखेड तालुक्यातील शरदवाडी येथे उशीरा आलेल्या मतदारांवर आक्षेप घेतल्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्याना भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याची घटना घडली त्याना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खर्डा येथील मतदान केंद्रावर दोन गटात बाचाबाची झाल्याने पोलीसांना सौम्य लाठीमार करावा लागला दरम्यान तालुक्यात मतदानाच्या दिवशी गंभीर वातावरण निर्माण झाले होते.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
शहरातूनही आले मतदार
गावखेड्यातील अनेकजण नोकरी, व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्ताने पुणे मुंबई शहरात वास्तव्यास आहेत. मात्र त्यांचे मतदान मूळ गावात आहे. त्यामुळे उमेदवारांनी शहरात वास्तव्यास असलेल्या अशा मतदारांना मतदानासाठी साकडे घातले. काहींनी तर मतदारांच्या येण्या-जाण्याचीही व्यवस्था केली होती .