Home शैक्षणिक कर्जत जामखेड मध्ये आ. रोहीत पवार यांची परिवर्तनाच्या वाटेने शिक्षणाची पहाट –

कर्जत जामखेड मध्ये आ. रोहीत पवार यांची परिवर्तनाच्या वाटेने शिक्षणाची पहाट –

कर्जत जामखेड मध्ये आ. रोहीत पवार यांची परिवर्तनाच्या वाटेने शिक्षणाची पहाट –
श्री शिंदे बी. एस.
(सचिव शिक्षक सेल जामखेड)
कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून व आ. रोहित दादा पवार यांच्या पुढाकाराने सी. एस. आर.फंडातून विविध प्रकारची मदत कर्जत जामखेड मधील शाळांना केली गेली.
जिल्हा परिषद व सरकारी शाळांना ३९९ शाळांना डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनलचे वितरण करण्यात आले. यामुळे शालेय शिक्षणात तंत्रज्ञानाची जोड मिळाली व शिक्षण आनंददायी झाले. यामुळे देशपातळीवरील विद्यार्थ्यांशी आपले विद्यार्थी भविष्यात स्पर्धा करु शकतील.
शालेय विद्यार्थ्यांची पायपीट कमी व्हावी व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी तीन किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरील विध्यार्थ्यांना १४००० सायकलींचे वाटप करण्यात आले. २८२ शाळांना क्रीडा साहित्य वाटप केले. क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी मदत केली गेली त्यामुळे मुलांना मैदानी खेळाची आवड निर्माण झाली.
शाळा तिथे ग्रंथालय या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून कर्जत आणि जामखेड मधील ३५० शाळांमध्ये २५००० पुस्तके आणि ठेवण्यासाठी चे रॅक उपलब्ध करुन दिले. अंतराळाची सफर फिरते तारांगण ऊपलब्ध करुन दिले. सर्व शाळतील ६७००० हून अधिक विद्यार्थ्यानी अंतराळ सफर केली. त्यामूळे विद्यार्थ्याना अंतराळाची माहिती मिळाली.
रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत व जामखेड मधील १४ शाळांना पिण्याचे शुद्ध फिल्टर पाणी व स्वच्छता ग्रहासाठी ३२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून काम पूर्ण केले. कर्जत व जामखेड तालुक्यातील रयतच्या ७ शाळामध्ये सोलर पॅनल बसवल्याने शाळेला २४ तास विना अडथळा वीज मिळू लागली व वीजबिलात बचत झाली.
४ कोटी रुपये खर्च करून सर्व सुविधानयुक्त मिरजगाव मध्ये शंभर वर्ष जुनी जिल्हा परिषद शाळा इमारत बांधली. यामध्ये प्रशस्त वर्गखोल्या, प्रयोग शाळा, वाचनालय, संगणक कक्ष, स्टाफ रूम, मुलानं मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छ्ता गृह उभारण्यात आले.राज्यातील अशा सर्व सुविधानयुक्त पहिल्याच शाळेचे उदघाटन दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या हस्ते करण्यात आले.
७० हजार विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी pad वाटप करुन विधायक पद्धतीने वाढदिवस साजरा केला. परीक्षा Pad वरती प्रेरणादायी शुभेच्छा संदेश देण्यात आला असून त्यातून प्रेरणा घेवून विदयार्थी आपले उज्ज्वल भवितव्य घडवतील. उद्याचं भविष्य असलेल्या ७० हजार विद्यार्थ्यांना छोटी भेट म्हणून ‘कंपास सेट’ च वाटप करण्यात आलं.विद्यार्थ्यांना स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही छोटीशी भेट नक्कीच उपयुक्त ठरेल.
सहा शाळांना अद्यावत कोडिंग लॅब उपलब्ध करुन दिल्या ज्यामधून विद्यार्थी कोडिंग चे शिक्षण घेत आहेत. शिक्षक दिनी कर्जत जामखेड तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना शुभेच्छा संदेश व भेटवस्तू सन्मानित करण्यात आले. कर्जत जामखेडचे आ. रोहित दादा पवार यांच्या वरील विशेष प्रयत्नातून कर्जत जामखेड मध्ये परिवर्तनाच्या वाटेने शिक्षणाची पहाट झाली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!