Home राजकारण धोंडपारगाव आणि बोर्ले येथील भाजप युवा कार्यकर्त्यांनी हाती घेतली स्वाभिमानाची तुतारी
धोंडपारगाव आणि बोर्ले येथील भाजप युवा कार्यकर्त्यांनी हाती घेतली स्वाभिमानाची तुतारी
आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वात भाजपच्या अनेक युवा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
जामखेड प्रतिनिधी
आमदार रोहित पवार यांच्या सर्वसमावेशक आणि विकासात्मक कामाने प्रेरित होत आज दि ७ नोव्हेंबर रोजी जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव आणि बोर्ले येथील असंख्य भाजप युवा कार्यकर्त्यांनी आमदार राम शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश केला.
गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने धोंडपारगाव येथील भाजप युवा कार्यकर्ते नागेश धुमाळ, शंकर शिंदे, माधव शिंदे तसेच बोर्ले येथील रवींद्र काकडे, आबासाहेब काकडे आणि सौदागर काकडे यांनी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.
या युवा कार्यकर्त्यांनी आमदार राम शिंदे यांच्यावर जातीपातीच्या राजकारणाचा आरोप करत त्यांना युवांच्या भविष्याची अजिबात चिंता नसल्याची भावना व्यक्त केली. आमदार रोहित पवार यांच्याकडे युवांच्या भविष्याचा आणि विकासाचा सखोल दृष्टीकोन असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वात गावोगावी असंख्य तरूण राष्ट्रवादीमध्ये सहभागी होत आहेत. कर्जत-जामखेडमधील युवांच्या भविष्याची खरी चिंता जर कोणाला असेल तर ती रोहित पवार यांनाच आहे, असे आता लोक बाजारात, चावडीवर, जागोजागी बोलू लागले आहेत. ही निवडणूक कर्जत-जामखेडकरांनी हातामध्ये घेतल्याचं चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आता फक्त रोहित पवार यांची लीड कीती ? असी गुजबुज नागरिक करताना दिसत आहेत.
error: Content is protected !!