बिस्कीट पुडा द्यायचा माहिती नाही तो कसला भुमिपुत्र – खा. निलेश लंके
कर्जतमध्ये खा. निलेश लंके यांनी डागली विरोधकांवर तोफ
जामखेड प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षांत कर्जत जामखेड मतदारसंघात आ. रोहित पवार यांचे काम मी डोळ्यांनी पहात आहे. जन्माला आलेल्या मुलापासून ते वयोवृद्धांची काळजी घेणारा हाच खरा भुमिपुत्र आहे. कधी लहान पोरांना बिस्कीट पुडा द्यायचा माहीत नाही तो कसला भुमिपुत्र असा टोला खा. नीलेश लंके यांनी आ. राम शिंदे यांचे नाव न घेता लावला.
कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आ. रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नगर दक्षिण मतदार संघाचे खा. नीलेश लंके आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या महाविजयी संकल्प सभेत विरोधकांवर खा. नीलेश लंके यांनी कडाडून टीका केली. यावेळी खासदार निलेश लंके हे बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड, आ. रोहित पवार, माजी आ. नारायण आबा पाटील, राजेंद्र देशमुख, दत्ता वारे, नामदेव देवा राऊत, जामखेड शिवसेना तालुका प्रमुख ॲड. मयूर डोके, कर्जत तालुका प्रमुख बळीराम यादव, विजयसिंह गोलेकर, अमोल राळेभात, राजेंद्र कोठारी, संजय वराट, हनुमंत पाटील, सुभाष गुळवे, सुर्यकांत मोरे, शामभाऊ कानगुडे, किरण पाटील, बाळासाहेब साळुंखे, राजेंद्र फाळके, रमेश आजबे, सचिन खरात मंगेश आजबे काकासाहेब कोल्हे, विजयसिंह गोलेकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. निलेश लंके म्हणाले की आ. रोहित पवार यांनी मुलांना कंपास वाटली तुम्ही सस्पेन्सील कींवा खोडरबर तरी द्यायचे, ज्याला बिस्किट पुडा द्यायचा माहिती नाही तो कसला भुमिपुत्र आ. रोहित पवार हेच खरे भुमिपुत्र आहेत. कारण जन्माला आलेल्या मुलाला कीट, रुग्णांना औषधे, गरीबांचे आरोग्य व ऑपरेशन, मुलांच्या शिक्षणास मदत व शेतकर्यांची खरी काळजी आ. रोहित रोहित पवार हे घेत आहेत. आणि हाच खरा भुमिपुत्र आहे. रोहित पवार हेलिकॉप्टर बदलतो पण आज पण तो जमिनीवर आहे आणि जमिनीवर राहुनच जनतेची सेवा करतो.
विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील सुज्ञ नागरिक फक्त रोहित पवार यांना मतदान करणार नाहीत, तर राज्याच्या भावी नेतृत्वाला मतदान करणार आहेत, असे प्रतिपादन अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी झालेल्या सभेत केले होते. भाषणाच्या शेवटी बोलताना खा. नीलेश लंके म्हणाले की सर्वांचा नाद करा पण पवारांचा नाद नाय करायचा पवार इज पॉवर आसे म्हणताच उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला व या माध्यमातून खा. निलेश लंके यांना लोकसभा निवडणुकी वेळच्या भाषणाची पुन्हा एकदा आठवण करून दिली.