जामखेड येथील दोन माजी नगरसेवक पती-पत्नीसह जवळा येथील सावता हजारे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात इनकमिंग सुरुच, आ. रोहित पवार यांची ताकद वाढली.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील दोन माजी नगरसेवक पती-पत्नी यांनी देखील प्रवेश केला आसुन यामध्ये संदीप गायकवाड वार्ड क्रमांक दहा व त्यांच्या पत्नी लता संदीप गायकवाड वर्ड क्रमांक सात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. तसेच तालुक्यातील जवळा येथील जवळा येथील युवा नेते, उत्तम वक्ते, विद्यमान ग्रा. सदस्य सावता (भाऊ) हजारे यांनी जेष्ठ नेते शरद पवार व आ. रोहित (दादा) पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. तसेच मागिल काही दिवसांनपासुन जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आसल्याने आ. रोहित पवार यांचे पारडे जड झाले आहे.
अनेक प्रतिष्ठित यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. यामुळे आमदार रोहित (दादा) पवार यांच्याकडे जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे. मागिल पाच वर्षांत आ. रोहित दादा पवार यांनी केलीली विकास कामे तसेच सर्वसामान्य जनता रोहित पवार यांच्या खंबीरपणे पाठीशी उभी राहिली आहे. त्यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झाली आहे.
याच अनुषंगाने जवळा गावचे युवा नेते, उत्तम वक्ते, संघर्षशील नेतृत्व, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सावता (भाऊ) हजारे यांनी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, रोहित (दादा) पवार, नामदेव (बाप्पु) राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षामध्ये नुकताच “गोविंदबाग” बारामती येथे प्रवेश केला.

मागिल दोन दिवसांपूर्वी देखील जामखेड तालुक्यातील विविध गावात भाजपला खिंडार पाडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंगेश (दादा) आजबे यांच्या प्रयत्नांतून आ. रोहित दादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये तालुक्यातील खामगाव, पाटोदा गरडाचे, राजेवाडी, धनेगाव, खुरदैठण, नान्नज, दैंडाचीवाडी, जातेगाव, बाळगव्हाण, आशा गावातील तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यामध्ये भाऊसाहेब ढेपे, किरण गोरे, दादा कुमटकर, योगेश सोले, माऊली गोरे, आदिनाथ गोरे, कृष्णा चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, दादा राजे भोसले, बापूराव तादगे, पंढरीनाथ शिकारी, धनंजय काळाने, शांतीलाल शिरसाट, तुषार शिकारे, चिंतामणी यादव, अक्षय काळाने, आप्पा गव्हाणे, राहुल ढवळे, सुशील गायकवाड, किरण गायकवाड, अजय गायकवाड, सुरज बडे, वैजनाथ गोपाळघरे, कृष्णा सानप, संभाजी गोपाळघरे, किशोर टिपरे दत्ता पोळ अशोक बेंद्रे व मोहन टिपरे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. सध्या जामखेड तालुक्यात युवा नेते मंगेश (दादा) आजबे यांच्या प्रयत्नांतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here