कोण बनेगा करोडपती विजेता किशोर आहेर चा सनराईज शैक्षणिक संकुल सन्मान
जामखेड प्रतिनिधी
कौन बनेगा करोडपती अमिताभ बच्चन यांच्या कार्यक्रमात 25 लाख रुपये जिंकलेल्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील खळेगावचा मेकॅनिकल इंजिनीअर किशोर आहेर याचा नुकताच पाडळी येथील सनराईज शैक्षणिक संकुल यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. आहेर हा संचालक डॉ. संजय भोरे यांचा नातेवाईक आहे. त्याचा सत्कार सनराईज शैक्षणिक संकुल पाडळी येथे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.

यावेळी बोलताना किशोर आहेर म्हणाला की, शालेय जीवन हा प्रत्येकासाठी सर्वात महत्वाचा व निर्णायक टप्पा असतो. याच काळात विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा विकास होतो म्हणूनच या काळात स्पर्धा परीक्षा आवश्‍यक असतात कारण शालेय जीवनापासूनच स्पर्धा हा विद्यार्थी अविभाज्य घटक आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. अशा स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी विद्यार्थी मानसिकरीत्या तयार असणे आवश्‍यक असते. परीक्षांच्या माध्यमातून वेळेचे नियोजन, उत्तर देण्याची पद्धत व विचारांची अचूकता, स्मरणशक्ती वाढते, विचारांची क्षमता वाढते, परीक्षेला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास वाढतो, चाकोरी बाहेरचा विचार करणे, यश-अपयश पचवण्याची ताकत निर्माण होते. असे मत कोण बनेगा करोडपती तील पंचवीस लाख रुपये विजेता किशोर आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. कोण बनेगा करोड पती चा 2 ऑक्टोबर 2024 चा 25 लाखा चा विजेता किशोर आहेर याचा सन्मान सनराईज शैक्षणिक संकुल पाडळी, जामखेड येथे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी संचालक तेजस भोरे, यशराज भोरे, प्राचार्या अस्मिता जोगदंड ( भोरे ), सचिन भोरे, प्रा. विनोद बहिर, दादासाहेब मोहिते, प्रदिप भोंडवे, छबीलाल गावित, सुनील घाडगे, विवेक सातपुते, सागर कदम,स्वाती पवार, चंद्रकांत सातपुते, सुषमा भोरे, साधना दंडवते, सविता काळे, अमर भैसडे, बिभीषण भोरे, सुरज वाघमारे, जयश्री कदम, हर्षा पवार, वैष्णवी तनपुरे, सानिया सय्यद, जयश्री सप्ते,महेश पाटील,दिनकर सरगर,हनुमंत वाघमारे, बुवासाहेब दहिकर, दीपक दहिकर यांच्या सह अनेक मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
किशोर आहेर हा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील खळेगाव चा आहे तो मेकॅनिकल इंजिनीअर आहे, तो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. तो एक खाजगी जॉब करत स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. त्याने विध्यार्थ्यांना आपण के बी शी च्या कार्यक्रमात कसे पोहचलो व अमिताभ बच्चन बरोबर सेट वर चा अनुभव सांगितला तसेच स्पर्धा परीक्षा बाबत विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. किशोर आहेर हा डॉ. संजय भोरे चा जवळचा नातेवाईक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here