Home ताज्या बातम्या जामखेड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या इमारतीवरील तिसर्‍या मजल्यावर चढून शोले स्टाईल आत्महत्येचा प्रयत्न

जामखेड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या इमारतीवरील तिसर्‍या मजल्यावर चढून शोले स्टाईल आत्महत्येचा प्रयत्न

जामखेड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या इमारतीवरील तिसर्‍या मजल्यावर चढून शोले स्टाईल आत्महत्येचा प्रयत्न
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील पिपल्स एजुकेशन सोसायटीच्या जामखेड महाविद्यालयात शिकणाऱ्या एस वाय बी एच्या विद्यार्थ्यांने महाविद्यालयाच्या इमारतीवरील तिसर्‍या मजल्यावर चढून शोले स्टाईल पद्धतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र जामखेड पोलिसांनी दुसर्‍या मजल्यावर जाऊन त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी झालेल्या झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की पिपल्स एजुकेशन सोसायटीच्या जामखेड महाविद्यालयात एस वाय बी एच्या वर्गात सिध्दु धनाजी शिंदे रा. धोंडपारगाव, वय 22 वर्षे हा शिक्षण घेत आहे. आज दि 18 सप्टेंबर 2024 रोजी नेहमी प्रमाणे कॉलेज भरले असताना सकाळी साडेदहा वाजता विद्यार्थी सिध्दु शिंदे हा महाविद्यालयांच्या तिसर्‍या मजल्यावर चढला व अचानक मला जगायचे नाही, मी आत्महत्या करणार आहे आसे म्हणत आत्महतेचा प्रयत्न केला.
यावेळी नेमका काय प्रकार आहे हे पहाण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थींची मोठी गर्दी जमली होती. खालून विद्यार्थी व शिक्षक विद्यार्थीस आत्महत्या करु नको आसे समजावुन सांगत होते. घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस स्टेशन चे पो.ह. प्रविण इंगळे, पो.कॉ देवा पळसे, जिब्राईल शेख हे घटनास्थळी आले. यावेळी पो. कॉ. जिब्राईल शेख व विद्यालयातील विद्यार्थी कृष्णा शिरसागर हे आत्महत्या करणार्‍या विद्यार्थींन पर्यंत मोठ्या शिताफीने पोहचले व त्यास पकडले यावेळी विद्यार्थ्यांस वाचताना पो.कॉ जिब्राईल शेख हे कीरकोळ जखमी झाले.
यानंतर विद्यार्थास पकडुन उपचारासाठी जामखेड येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बाबत अधिक माहिती घेतली असता सदर विद्यार्थ्याचे मानसिक संतुलन बिघडले आसुन त्याच्यावर उपचार सुरू आहेत आसे देखील त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. यानंतर सदर विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार करुन घरी सोडण्यात आले.
चौकट
महाविद्यालयात एवढी मोठी घटना घडुन ही महाविद्यालयाचे प्राचार्य त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. ते घटना घडुन गेल्यावर उशिरा महाविद्यालयात आले. सदरचा विद्यार्थी मनोरुग्ण आसेल तर त्याच्यावर नातेवाईकांनी योग्य उपचार करणे गरजेचे आहे. कारण हा मनोरुग्ण विद्यार्थी पुन्हा महाविद्यालयात आला आणि विद्यार्थ्या कींवा शिक्षकासोबत काही प्रकार घडला तर याला जबाबदार कोण रहाणार असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!