मिरजगावमध्ये ब्रिटिशकालीन वास्तूचे विस्तारीकरण, मनीष सिसोदिया यांच्या हस्ते लोकार्पण होणार
आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत-जामखेडमध्ये शैक्षणिक विकासाला चालना
कर्जत-जामखेड: १८ दि
आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत-जामखेड विधानसभा मतदरसंघातील मिरजगाव येथील ब्रिटिशकालीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नूतनीकरण करण्यात आले असून, या शाळेचं तसेच जामखेडमधील जिल्हापरिषद मुलींच्या शाळेच्या १० वर्ग खोल्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या दोन्ही वास्तूचं दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. यासोबतच जामखेडमधील जिल्हा परिषद शाळेत नव्याने ५ वर्ग खोल्यांचे बांधकाम करण्यात येणार असून त्याचे भूमिपूजनही यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अहिल्यानगरचे खा.निलेश लंके आणि प्रा.नितेश कराळे मास्तर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम शुक्रवारी, २० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता जिल्हापरिषद शाळा, जामखेड तर सकाळी १० वाजता मिरजगाव बाजारतळ याठिकाणी होणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार रोहित पवार सातत्याने प्रयत्नशील आहेत. या शाळांच्या नूतनीकरणामुळे विद्यार्थी उत्तम वातावरणात शिक्षण घेऊ शकतील. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शाळा व शैक्षणिक सोयीसुविधांच्या विकासासाठी राबविल्या जात असलेल्या या उपक्रमामुळे कर्जत-जामखेड परिसरातील शैक्षणिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमाची सध्या जोरदार तयारी सुरू असून या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्याला कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.