कत्तलीसाठी घेऊन जाणार्या 55 जनावरांनी भरलेला टॅम्पो पकडला.
जामखेड प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील खडकत येथुन धाराशिवकडे कत्तलीसाठी घेऊन जाणारा 55 जणावरांनी भरलेला टॅम्पो खर्डा पोलीसांनी पकडला आहे. या प्रकरणी चार जणांनविरोधात खर्डा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर जणावरांसह टेम्पो असा एकुण 4 लाख 7400 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपी रईस गुलाब पठाण, वय 36 वर्षे रा. खडकत ता. आष्टी जि. बीड, राजु (पुर्ण नाव माहीत नाही) रा. खडकत ता. आष्टी जि.बीड, सद्दाम कुरेशी (पुर्ण नाव माहीत नाही) रा. खडकत ता. आष्टी जि. बीड व अकबर टकारी रा. गौस किराणा स्टोअर, ता. धाराशिव जि. धाराशिव आशा एकुण चार जणांनविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांन कडुन मिळालेली माहिती अशी की आज शुक्रवार दि 13 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी साडेसहा वाजता खर्डा-भुम रोडवरील शिवपट्टण कील्ल्याजवळ 55 जणावरांनी भरलेला टेम्पो क्र. MH-17-T-3500 खर्डा पोलीसांनी पकडला आहे. हा टेम्पो बीड जिल्ह्य़ातील आष्टी तालुक्यातुन धाराशिव या ठिकाणी चालला होता. या 55 जनावरांन मधुन 8 लहान वासरे मयत अढळुन आली आहेत. तसेच क्राँस जातीचे जर्शी गाईचे काळ्या-पांढऱ्या रंगाचे लहान 42 नर 5 काळ्या पांढर्या रंगाच्या जर्शी गाई व एक आयशर टेम्पो आसा एकुण 4 लाख 74 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी संकेत रमाकांत सातपुते वय 23 वर्षे रा. खर्डा यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वरील चार आरोपीन विरोधात खर्डा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम 325, 3(5) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधि.1995 चे कलम 5(अ), 5(ब) तसेच प्राण्यांना निर्दयतेणे वागविण्यास प्रतिबंध कायदा 1960 चे कलम 3 व 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई सपोनि विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ. संभाजी शेंडे, शशिकांत मस्के, बाळू खाडे, अशोक बडे, वैजनाथ मिसाळ यांनी केली असुन पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी शेंडे हे करत आहेत.