Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये मुक्त संचार करणाऱ्या कोल्ह्यास पकडण्यात वनविभागाला यश.

जामखेडमध्ये मुक्त संचार करणाऱ्या कोल्ह्यास पकडण्यात वनविभागाला यश.

जामखेडमध्ये मुक्त संचार करणाऱ्या कोल्ह्यास पकडण्यात वनविभागाला यश.
जामखेड प्रतिनिधी
जामखेडमध्ये सलग दोन दिवस मुक्त संचार करत फिरणाऱ्या वन्य प्राणी कोल्ह्यास सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या पुढाकाराने व वन विभागाच्या मदतीने पकडून रेक्सु टीमच्या ताब्यात देण्यात आले.
गेल्या दोन दिवसापासून गळ्यात साखळदंड बांधलेल्या अवस्थेत जामखेड शहरात मुक्त संचार करणारा एक कोल्हा हा जंगली प्राणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व मित्र समुहाच्या पुढाकाराने आणि वन विभागाच्या सहकार्याने पकडुन त्याला पुणे येथील रेक्सु टीमच्या हवाली करण्यात आले आहे.
साखळदंडासहीत फिरणाऱ्या या कोल्ह्याची शहरात खुपच चर्चा रंगली होती. त्यातच लहान मुलांना कुतुहल पण पालक वर्गात त्याच्या फिरण्याची भीती होती. हा विषय शेवटी जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी हाती घेत वन विभागाच्या मदतीने त्या कोल्ह्यास पकडून आपल्या रुग्णवाहिकेच्या मदतीने घरी आणले, नंतर त्याच्यावर माया ममतेची पाखड करत त्याला दूध भाकरी खाऊ घातली व शेवटी वन विभागाच्या मदतीने त्याची पुणे रेक्सु टीमकडे रवानगी केली. सर्वत्र हा एक कुतुहलाचा विषय ठरत आहे. हा कोल्हा पकडण्याच्या कामी सचिन खामकर, प्रमोद टेकाळे, दीपक ददियाल, अल्फाज शेख, भाऊसाहेब भोगल, अभिजीत कापसे, अनिश टेलर, सुभान शेख आदींनी मोलाचे सहकार्य केले.
वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके, वनपाल प्रविण उबाळे, वनरक्षक शांतीलाल सपकाळ, वन सेवक शांमराव डोंगरे, दौड/पुणे येथील रेक्सु टीमचे प्रशांत कौलकर यांनी विशेष परित्रम घेतलेआता पर्यंत बर्‍याच ठिकाणी जखमी अवस्थेत सापडलेले हरीण, मोर ,काळविट, घुबड ,सायाळ, कासव मांडूळ इत्यादी वन्य प्राण्यांना ताब्यात घेऊन वनविभागाच्या मदतीने पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या साह्याने त्यांना जीवदान दिले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!