फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार
जामखेड प्रतिनिधी
आण्णा सावंतच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला पंचवीस जून 2024 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जामखेड कोर्टाने अगोदरच जामीन फेटाळला होता नुकताच श्रीगोंदा सेशन कोर्टाने फेटाळला आहे. मात्र आरोपी मोकाट फिरतात मात्र पोलीसांना दिसत नाहीत. आरोपींकडून जीवीताला धोका असल्याचे निवेदन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. तसेच जामखेड पोलीसांनी आरोपीला अटक केली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा फीर्यादी सौरभ कदम यांनी निवेदनात दिला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आण्णा सावंत याच्या विरोधात नोकरीचे आमिष दाखवून पाच लाखाची फसवणूक केली असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगोदरही जामखेड पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल आहे. माझी मंत्रालयात ओळख आहे. मी तुला आरोग्य विभागात कायमस्वरूपी सरकारी नोकरी लावून देतो असे म्हणत संभाजी ब्रिगेडचा प्रदेश उपाध्यक्ष आण्णा सावंत याच्या सह दोघा जणांनी नोकरीचे आमिष दाखवून पाच लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी आण्णा सावंत सह दोघांवर जामखेड पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.