भाजप अल्पसंख्याक मोर्चाची जामखेड तालुका कार्यकारणी जाहीर
जामखेड प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विधानसभा परिषद सदस्य नामदार प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जामखेड तालुका अध्यक्ष जमीर सय्यद यांनी नुकतीच जामखेड तालुक्याची भाजप अल्पसंख्याक मोर्चाची कार्यकारिणी जाहीर केली आहे.
या कार्यकारणीत करण्यात आलेल्या निवडीमध्ये जामखेड शहराध्यक्ष पदी शाकीर आसीफ खान, खर्डा शहर अध्यक्ष फिरोज इकबाल पंजाबी, जवळा शहर अध्यक्ष सत्तार गणी शेख, कोशाध्यक्ष आसीफ कमाल शेख जामखेड व अल्पसंख्याक युवा मोर्चाच्या तालुका युवक अध्यक्षपदी नान्नजचे मझहर इसहाक पठाण यांची निवड करण्यात आली आहे.
याच बरोबर जामखेड भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी जावेद गुलाब शेख चौंडी, इसहाक गुल्लु शेख बावी, खाजा हाशम कुरेशी खर्डा, जमाल अय्युब शेख जवळा, अजमेर आदम सय्यद पिंपरखेड, सद्दाम लतिफ पठाण नान्नज, यांची निवड करण्यात आली आहे. चिटणीस पदी फय्याज हसन कुरेशी जामखेड, आदिल नावेद शेख जवळा, जावेद रहेमान शेख खर्डा, फारुख मकबुल शेख नान्नज, रमजान निजाम शेख अरणगाव, शाहरुख हसन पठाण नान्नज, जाकिर शब्बीर शेख खर्डा व अन्सार युसुफ पठाण मुसलमान वाडी यांची निवड करण्यात आली आहे. सरचिटणीस पदी जाकिर शब्बीर शेख खर्डा, रियाज मगबुल शेख पिंपरखेड, अर्शद नजमोद्दीन शेख धनेगाव, ताहेर रशिद शेख हळगाव, नावेद दाउत शेख नान्नज व जमीर मद्देखान पठाण पाटोदा गरडाचे, यांची निवड करण्यात आली आहे.
कायम निमंत्रीत सदस्य म्हणून नामदार प्रा राम शिंदे, अजय विष्णु काशिद डॉ.भगवान मुरुमकर, पवन राळेभात, मनोज कुलकर्णी, डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे, रवी सुरवसे, सलीम महंमदनूर बागवान, सय्यद आरीफ जमशीद, डॉ.अलताफ शेख, सलीम इस्माईल तांबोळी, हबीब महेबूब शेख, शफिक अय्यास शेख हे असणार आहेत.
यावेळी बोलताना भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जामखेड तालुका अध्यक्ष जमीर सय्यद म्हणाले की तालुक्यातील सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाने अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पिडीत शोषित वंचित घटकासाठी मोठे काम उभे करणार आहे व भाजप अल्पसंख्याक मोर्चाची गाव तीथे शाखा व घर तीथे कार्यकर्ता ही योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here