समाजात सर्वधर्मसमभाव रुजवण्यासाठी सलोखा गरजेचा- मा.स. गफ्फारभाई पठाण
मा.सरपंच गफ्फारभाई पठाण यांच्याकडून सलग दहाव्या वर्षी पंढरपूर दर्शन सोहळ्याचे केले होते आयोजन
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच गफ्फार भाई पठाण यांच्याकडून सलग दहाव्या वर्षी गावातील वारकरी बांधवांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर दर्शन सोहळ्याचे आयोजन केले होते.
पाटोदा गरडाचे येथे गेल्या दहा वर्षापासून संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर यांची सर्वधर्म समभावाची शिकवण समाजात रुजवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा धडाडीचे माजी सरपंच गफ्फारभाई पठाण हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात तसेच ते पाटोद्या मार्गे पायी जाणाऱ्या प्रत्येक दिंडी साठी भोजनाची, चहापाणी व अल्पोपाहाराची व्यवस्था करतात व मोठ्या भक्तिभावाने त्यांच्यामध्ये मिसळून ते दिंडीला पुढे मार्गस्थ करतात. यात्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होते.
यावेळी गफ्फारभाई पठाण म्हणाले की संत तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज यांची शिकवण तसेच सर्वधर्मसमभावाची शिकवण समाजात रुजवण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून वारकऱ्यांची मनोभावे सेवा करत आहे व ही सेवा मी अशीच अखंड पुढे चालू ठेवणार आहे. सकाळी ९. नऊ वाजता टाळ मृदंग व फटाक्यांच्या आतिषबाजीत वारकऱ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले तसेच पंढरपूर दर्शन सोहळ्यानिमित्त पंढरपूर कडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी चहा व नाष्ट्याची सोय करण्यात आली होती वारकऱ्यांना गाडीमध्ये बसण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून गाद्यांची व्यवस्थाही केली होती.
यावेळी उपस्थित माजी सरपंच गफ्फार भाई पठाण, विष्णू भवर, शहाजी नवले, कल्याण कवादे, अनिल डोरले, नागू राऊत, प्रकाश कडू, शहाजी सावळे, रोहिदास घोलप, नितीन पारे, अरुण ढवळे, मोरे सर, राजू समुद्र, दगडू खाडे, नितीन सांगळे, विशाल पाचबैल, वैभव झिंगाडे, गंगाराम सोनटक्के, विश्वनाथ चव्हाण, महादेव पाचबैल, गणेश कापसे, किसन ढवळे अदी ग्रामस्थ व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठल नामाचा गजर करत वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले.