मुख्यमंत्री“माझी लाडकी बहिण योजना”महिलांचे झिरो बॅलन्सने बँकेत खाते उघडली जातील– संचालक अमोल जगन्नाथ राळेभात
जामखेड प्रतिनिधी
महिलांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यासाठी गेलेनंतर तेथील खाते उघडण्याची क्लिष्ट पद्धत, जास्त अनामत रक्कम व खाते उघडण्यास येत आसलेल्या अडचणी लक्षात घेऊन जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने बँकेत खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी महिलांना झीरो बॅलन्सने खाते उघडण्यात येणार आहे आशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.
महाराष्ट्र शासनाने माझी“लाडकी बहिण योजना”योजना आणली असून त्या योजनेमार्फत पात्र महिलांना दरमहा रक्कम रु. १५००/- शासनाकडून दिले जाणार असून त्यासाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. महिला राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यासाठी गेलेनंतर तेथील खाते उघडण्याची क्लिष्ट पद्धत, खात्यावर ठेवावे लागणारे २०००/- डिपॉझिट, वेगवेगळ्या प्रक्रियेतून जावून मग मिळणारे पासबुक तसेच तेथे होणारी गर्दी पाहता त्याठिकाणी महिलांना खाते उघडण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात आल्यानंतर जिल्हा सहकारी बँकेने खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी महिलांना खाते उघडण्यास अडचणी येऊ नयेत यासाठी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले साहेब व सर्व संचालक मंडळाने“नो फ्रील”खाते उघडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल जगन्नाथ राळेभात यांनी दिली.