पक्ष सर्वसामान्य जनतेच्या न्याय 

रोखठोक जामखेड…..

पक्षाचे कार्यकर्ते हीच पक्षाची मूळे असून त्यामुळेच पक्षाचे झाडे वादळातही भक्कम पणे उभे आहे. पक्षाचा देशभरात विस्तार करताना राष्ट्र, राज्य, मग कार्यकर्ते अशी भूमिका ठेवून पक्ष सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत आहे. हे सांगण्यासाठी पक्षाची ,,”आपला परिवार संवाद यात्रा “काढली असून या यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळत असून पक्षाची मुळ किती खोलवर पोहोचली असल्याचे यातून दिसत आहे असे प्रतिपादन आम आदमी पार्टी महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी केले.

आम आदमी पार्टीच्या वतीने राज्यात काढण्यात आलेल्या आपला परिवार संवाद यात्रेचे जामखेड शाखेच्या वतीने जामखेड येथे स्वागत करण्यात आले. यावेळी कोरोना सर्व नियम पाळून येथील कार्यालयात घेतलेल्या छोट्याखानी कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करताना धनंजय शिंदे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आम आदमी पार्टीची राज्याचे सहसंयोजक किशोर माध्यम होते. राष्ट्रीय परिषद सदस्य किरण उपकारे, किसन आव्हाड , तिलक डुंगरवाल, प्रा.आशोक डोंगरे, शरद शिंदे ,राजेंद्र कर्डिले, राजेंद्र नागवडे, भरत खळाळ, सुचित्रा शेळके, अश्विन शेळके, संपत मोरे, विकास डेंगळे, राहुल रणपिसे, भरत डेंगळे, बोडखे दादा, संतोष नवलाखा, बजरंग सरडे, संदेश घायतडक, संभाजी आव्हाड, सुंदर परदेशी, डॉ.दता भोरे, अजय भोसले , स्वानंद कुलकर्णी, महेश बोरकर, बिपीन वारे, जयपाल वर्मा, समीर मणियार, अतुल खराडे, निजामुद्दीन शेख, शुभम बनकर आदि सह अहमदनगर जिल्हा चे आम आदमी पार्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय भाषणात राज्याचे सहसंयोजक किशोर मानध्यान म्हणाले की आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जी पक्षाचे बी पेरले होते. त्याचे आता मोठ्या वटवृक्षात रूपांतर होत असून या वटवृक्षाला कुठे पाने कुठे फुले तर कुठे फळे दिसू लागली आहेत.

आपला परिवार संवाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याची उज्वल भविष्य दिसत आहे. पक्षाचे मरून कार्यकर्ते मोठ्या संख्येने असून त्यांचा उत्साह मोठा आहे राज्यात विविध संस्थांमध्ये मिळालेले यश अशा कार्यकर्त्यांच्या कामाचे फलित आहे जर कोणतेही काम विचार व नियोजनपूर्वक केले तर यश नक्कीच येते तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्याबरोबर एक मजबूत टिम पाहिजे तशी ती अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर असल्यानेच दिल्लीमध्ये पक्षाचे सरकार आले आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात सत्ता आणायचे असेल तर पक्षाच्या निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी उभी राहणे गरजेचे आहे असे मत महाराष्ट्र आम आदमी पार्टीचे सहसंयोजक किशोर मध्यान यांनी व्यक्त केले. यावेळी किसन आव्हाड, बजरंग सरडे, संतोष नवलाखा, तिलक डुंगरवाल, सुचित्राताई शेळके, शरद शिंदे, प्रा. अशोक डोंगरे, राजेंद्र नागवडे आदि मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड बिपिन वारे केले तर आभार किसन आव्हाड यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here