रोखठोक जामखेड…..

अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या प्रियदर्शनी शाळा अलमगिर येथे झालेल्या 17 वर्षे वयोगटातील शुटींग हाॅलीबाॅल स्पर्धेत महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील संघांनी सहभाग घेतला होता यामध्ये अहमदनगर शुटींग हाॅलीबाॅल संघातील खेळाडू याहिया इरफान पठाण यांने उत्कृष्ट खेळ करत प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले त्याची खेळातील कामगिरी पाहुन निवड समितीने 17 वर्षे वयोगटात महाराष्ट्र शुटींग हाॅलीबाॅल संघात निवड करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना याहिया पठाण म्हणाला की, माझी महाराष्ट्र संघात निवड झाली याचे श्रेय माजी प्राचार्य इब्राहिम पठाण यांनाच आहे त्यांनीही विभागीय संघात शुटींग हाॅलीबाॅल स्पर्धेत नैपुण्य मिळवले होते. त्याचाच वारसा मी पुढे चालवत आहे. मला जावेद सर, अफजल पिरजाडे, माझी नगरसेवक फय्याज शेख व माझे चुलते साजिद पठाण यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या निवडीबद्दल अहमदनगर जिल्ह्यातुन अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

आॅल इंडिया शुटींग हाॅलीबाॅल स्पर्धा गजरात येथील अहमदाबाद येथे होणार आहेत यासाठी नेहरू युवा पुरस्कार विजेते गफ्फार शेख, पै. जितेंद्र लांडगे, महेमुद शेख, सादिक शेख, जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निमोणकर, नासीर पठाण, मिठूलाल नवलाखा, उपाध्यक्ष सुदाम वराट, अविनाश बोधले , ओंकार दळवी, दिपक देवमाने, मोहिद्दीन तांबोळी, यासीन शेख, समीर शेख, प्रकाश खंडागळे, संजय वारभोग, किरण रेडे, अशोक वीर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, शिवसेना तालुकाउपप्रमुख संजय काशीद, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे शुभेच्छा दिल्या .जामखेड येथे नागरी सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निमोणकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here