शंभूराजे कुस्ती संकुलाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या पहिल्या मुक्कासाठी पत्रावळी व ग्लासची मदत
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील शंभूराजे कुस्ती संकुलचे संचालक मंगेश (दादा) आजबे हे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आघाडीवर असतात. राजमाता जिजाऊ जयंती निमित्त रक्तदान शिबीर, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य आखाडा भरवितात तसेच इतर अनेक सामाजिक उपक्रम राबवतात. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनासाठीच्या पहिल्या मुक्कामासाठी शंभूराजे कुस्ती संकुल जामखेड तर्फे मंगेश (दादा) आजबे यांनी मोफत सहा हजार पत्रावळी व सहा हजार ग्लास देण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे २६ जानेवारी पासून मुंबईत आमरण उपोषण सुरु करत आहेत. अंतरवली ते मुंबई प्रवासातील मुक्कामाचे टप्पे ठरलेले आहेत सकाळी 9 वाजल्यापासून 12 पर्यत चालत निघायचे
20 जाने सकाळी 9 वाजता अंतरवलीमधून निघायचे
20 जानेवारी पहिला मुक्काम- शिरूर (बीड) तालुक्यातील मातोरी डोंगर पट्ट्यात असणार आहे यासाठी शंभूराजे कुस्ती संकुल जामखेड तर्फे मंगेश (दादा) आजबे यांनी सहा हजार पत्रावळी व सहा हजार ग्लास पाठवले आहेत.
दुपारी 12 पर्यंतच सर्वांनी चालायचे आहे
21 जानेवारी दुसरा मुक्काम– करंजी घाट, बारा बाभळी-(अ. नगर)
22 जानेवारी तिसरा मुक्काम-रांजणगाव-(पुणे जिल्हा)
23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास, पुणे
24 जानेवारी पाचवा मुक्काम- लोणावळा
25 जानेवारी 6 वा. मुक्काम – वाशी, नवी मुंबई
26 जानेवारी 7 वा. मुक्काम आझाद मैदान आंदोलन स्थळी
शिवाजी पार्क आणि आझाद मैदान आम्हाला दोन्ही मैदान लागतील
मनोज जरांगे 26 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार
मुंबईतील आंदोलना दरम्यान मराठा समन्वयकांनी आचार संहिता पुढील प्रमाणे आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील बांधवांनी त्यांच्या हद्दीपर्यंत चालायचे आहे
पुण्यामध्ये मराठा समाजाच्या करोडोचा आकडा असणार
सर्व प्रकारची वाहने मुंबईकडे जाताना असणार आहेत
मुंबई जाणारे प्रत्येकजण आपल्या वस्तू सोबत घेणार आहेत
झोपताना आपल्या वाहनाजवळ झोपायचे आहे
मुंबई जाताना कुणीही व्यसन करायचे नाही
मुबई जाताना प्रत्येक जणांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे
ज्यांच्याकडे पाण्याचे टँकर असेल, जनरेटर असेल ते त्यांनी घेऊन यावे
आपण आपल्या लोकांची सेवा करायची आहे.