तालुक्यातील बाळगव्हाण येथे विजेचा धक्का बसून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील पोल्ट्री व्यवसाईक शुभम गोकुळ दाताळ (वय २४) या तरूणाचा विजेचा मुख्य वाहिनीला झटका बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर वडील गोकुळ दाताळ हे या घटनेत जखमी झाले आहेत. या घटनेमुळे खर्डा व बाळगव्हाण परिसरात नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
या बाबत सविस्तर माहिती आशी की काल दि. १ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान यातील मयत तरूण शुभम गोकुळ दाताळ व
त्याचे वडील आपल्या स्वतःच्या पोल्ट्री फार्मच्या शेड जवळील लाईटचा सप्लाय बंद असल्याने डीपी जवळील लाईनला डिओ टाकत असताना अचानकपणे त्यांच्या हातातील लोखंडी पाईप मेन लाईनला लागल्याने दोघांनाही विजेचा जोराचा धक्का बसला या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या जवळ उभे असणारे त्याच्या वडिल बाजूला फेकल्याने ते जखमी झाले.

मयत तरूण शुभम दाताळ हे इलेक्ट्रिक इंजिनिअर पदवी घेऊन नोकरी न करता स्वतःचा पोल्ट्री व्यवसायात चांगल्या पद्धतीने करून भरारी घेतली होती. लोणी फाट्या जवळील त्यांच्या शेतात त्यांनी १४००० हजार बारामती ऍग्रो कंपनीच्या कोंबड्यांचे मोठे एसी शेड उभे केले होते. आधुनिक तंत्रज्ञानाने कोंबड्यांना खाद्य वाटप, पाणी देणे, स्वच्छता ठेवून त्यांनी व्यवसायात मोठी प्रगती करण्यास सुरुवात केली होती. दर महिन्याला शुभमला लाखो रुपयांचा नफा मिळत होता.

त्यांनी त्याच पद्धतीने दुसऱ्या शेडच्या उभारण्याचे काम हाती घेतले होते. शुभम दाताळ यांचा स्वभाव शांत मनमिळावू व प्रेमळ होता आपल्या कामाशी प्रामाणिक राहणे हा त्यांचा स्वभावाचा गुणधर्म होता. शुभम हा अविवाहित होता त्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे खर्डा परिसरात नागरीक हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांच्या मागे आई-वडील, आज्जी, एक भाऊ असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here