एमआयडीसीचे श्रेय आ. रोहित पवार यांना जाईल त्यामुळे विरोधकांना पोटशूळ

जामखेड शहरातील खर्डा चौकात राष्ट्रवादी व युवकांनी केले चक्काजाम आंदोलन

जामखेड प्रतिनिधी

हक्कच्या औद्योगिक वसाहत देण्याबाबत राजकारण होत असून भाजपचे माजी मंत्री आमदार राम शिंदे हेच या प्रकरणात हेतूपूर्वक अडवणूक करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी आमदार राम शिंदे यांचे नाव न घेता केला. तसेच एमआयडीसीचे श्रेय आ. रोहित पवार यांना जाईल त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला आहे आशा संतप्त भावना आंदोलन कर्त्यांनी जामखेड येथिल चक्काजाम आंदोलनात दरम्यान व्यक्त केल्या.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आ. रोहित पवार यांच्या उपोषणानंतर एमआयडीसी मंजुर करण्याचे अश्वासन दिले होते मात्र तरीदेखील एमआयडीसी मंजुर झाली नाही. त्यामुळे पुन्हा कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीचा प्रश्न पेटला आसल्याने आज दि २७ रोजी जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व युवकांच्या वतीने खर्डा चौक या ठीकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

या वेळी आंदोलन कर्त्यांनी खर्डा चौकात आंदोलन करतावेळी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले की युवकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडण्यासाठी, जनतेचे व युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. आपण आठ दहा खात्याचे मंत्री असताना एमआयडीसी साठी काय केले याचे उत्तर द्या मगच एमआयडीसीला आडकाठी आणा आसा प्रश्न आंदोलन कर्त्यांनी आ. राम शिंदेंचे नाव न घेता केला. तसेच जर लवकरात लवकर एमआयडीसी मंजुर झाली नाहीतर पुढचे आंदोलन आनखी त्रीव करण्यात येईल आसा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.

या आंदोलनात महीला देखील सहभागी झाल्या होत्या. चक्काजाम आंदोलना दरम्यान बराच वेळ शहरातील ट्रॉफक जाम झाले होते. यावेळी आंदोलकांनी कोण म्हणतं देत नाही ,घेतल्या शिवाय रहाणार नाही. एमआयडीसी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, आशा घोषणा दिल्या. या आंदोलनास संभाजी ब्रिगेडनी देखील पाठींबा दिला होता.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, राजेंद्र कोठारी, संभाजी ब्रिगेडचे अण्णासाहेब सावंत, सुधिर राळेभात,
रमेश आजबे, मंगेश आजबे, मोहन पवार, संदीप गायकवाड, हारीभाऊ आजबे, ॲड. हर्षल डोके, समीर पठाण पाटोदा, काकासाहेब वाळुंजकर, पवनराजे राळेभात, नरेंद्र जाधव, वैजीनाथ पोले, उमर कुरेशी, शरद शिंदे, पिंटू बोरा, काकासाहेब कोल्हे, अमर चाऊस नान्नज, शहाजी राळेभात, निखिल घायतडक, महेश राळेभात, प्रकाश काळे, प्रकाश सदाफुलें, कैलास वराट, हनुमंत पाटील, युवराज ऊगले, सागर कोल्हे, सुंदरदास बिरंगळ, ऋषीकेश डुचे, काकासाहेब चव्हाण, संतोष पवार, सौ. विद्या वाव्हळ, अनुराधा अडाले, वैशाली शिंदे, अनुष्का वारे, प्रिती सदाफुले, संगीता तोरडमल, स्मिता गुलाटी, तरनुम शेख , शुभांगी नन्नवरे, रंजना पवार आदी महिला उपस्थित होत्या.

चौकट

साहेब आंदोलन करु द्या? आता आंदोलन नाही, तर पुन्हा कधीच एमआयडीसी नाही?

बराच वेळ आंदोलन सुरू आसल्याने पोलीस निरीक्षक महेश पाटील हे आंदोलन कर्त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी आंदोलन कर्त्यांनी अधिकार्‍यांना विनंती केली की दडपशाही करु नका? आमचा तालुका दुष्काळग्रस्त आहे आम्हाला रोजगार पाहीजे. आता एमएमआरडीसी मुळे हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे .आज आंदोलन झाले नाही तर पुन्हा कधीच एमआयडीसी येणार नाही. त्यामुळे साहेब आम्हाला आंदोलन करु द्या? आशी विनंती आंदोलन कर्त्यांनी अधिकार्‍यांनकडे केली त्यामुळे पुन्हा आंदोलन थोडा वेळ सुरु राहीले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here