

जिल्हा सहकारी बँकेमध्ये ३२ वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली हेच माचे भाग्य – कॅशियर संतराम निगुडे
जामखेड प्रतिनिधी : 32 वर्षे सहकारी बँकेच्या कॅशियर या पदावर नोकरी करताना मी प्रामाणिक काम केले आणि बॅंकेच्या सभासदाना चांगल्या प्रकारे सेवा दिली त्यामुळेच माझ्या बॅंकेच्या 32 वर्षीच्या सेवेत कलकं लागला नाही हेच माझे भाग्य आहे आसे मत संतराम निगुडे यांनी सेवापुर्तीच्या सत्कार प्रसंगी आपले मत व्यक्त केले.

यावेळी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक सुधीर राळेभात पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक पांडूरंग सोले पाटील, जिल्हा सहकारी बँकेचे संपर्क आधिकारी भारत सोले पाटील, तालुका विकास अधिकारी दत्तात्रय सरोदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ गणेश जगताप, अजिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डॉ महादेव पवार, माजी उपसभापती दिपक पाटील, चेअरमन शाहजी पाटील, चेअरमन राजेंद्र मोटे, व्हा.चेअरमन गणेश चव्हाण, माजी चेअरमन भारत काकडे, माजी सरपंच संतोष निगुडे, माजी सरपंच बापू निगुडे, ग्रामपंचायत सदस्य तात्याराम निगुडे, मा ग्रामपंचायत सदस्य अविनाश निगुडे, प्रगतशील शेतकरी महादेव वनवे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बर्डे, प्रगतशील शेतकरी भरत रोडे, संतोष साबळे, उपसरपंच आबासाहेब ढवळे, संचालक काशीनाथ मते, माजी सरपंच कानिफनाथ मते, माजी गटसचिव अध्यक्ष सत्तारभाई शेख, जवळा शाखाधिकारी सचिन दळवी, क्षेत्रिय अधिकारी बापू कांबळे, जामखेड तालुक्यातील सहकारी बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हा चेअरमन, सचिव, व सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राळेभात पाटील म्हणाले की आज रोजी तालुक्यातील संतराम निगुडे व शाखा अधिकारी भिमराव बारवकर आणि दिघोळ येथील महाडिक आसे तीन जन बँकेतून सेवानिवृत्त झाले या सर्व अधिकाऱ्यांनी इमानदारी आणि काटेकोर पणाने चांगल्या प्रकारे काम केले. त्यामुळे आज त्यांना आपल्या तालुक्यातच सेवानिवृत्त होता आले आसेच सर्व अधिकाऱ्यांनी आसेच काम करावे आसे राळेभात म्हणाले तसेच आज संपूर्ण सहकारी बँकेमध्ये कमी कर्मचारी आसल्याने आज काम करता येत नाही तरी महाराष्ट्र सरकारने जिल्हा बँकेत नवीन पदाच्या भरतीला परवानगी देण्यात यावी आशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

बँक म्हटल की आर्थिक व्यवहार आला तो म्हणजे विश्वास संतराम निगुडे हे बॅकेत कॅशियर म्हणून काम करत होते सकाळी बँक साडेदहा वाजता बँकेचे व्यावहर सुरू होतात परंतु सकाळी शेतकऱ्यांना लवकर आपल्या शेतातील कामासाठी जावे लागत होते निगुडे यांच्या कडे विश्वासानी पैसे काढण्याचा चेक व भरणा आणि आपले लाईट बिलांचे पैसे देऊन जायचे शेतकऱ्यांना मदत म्हणून ते सर्व कामे करुन संध्याकाळी शेतकऱ्यांना सर्व व्यवहार पूर्ण करून द्यायचे आसे कुठे घडत नाही परंतु जामखेड तालुक्यात घडले ते म्हणजे सहकारी बँकेचे कॅशियर संतराम निगुडे यांचा आदर्श उपक्रम माजी जिल्हा बँकेचे संचालक पांडूरंग सोले पाटील यांनी सेवापुर्ती सोहळ्याच्या वेळी सांगितले. तसेच त्यांनी जुन्या आठवणीला उजाळा दिला आणि सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.






