जामखेड प्रतिनिधी

जवळा गावच्या राजकारणाचा केंद्रबिंदु ठरलेल्या तसेच जवळा गावच्या जडणघडणीत आणि विकास कामात मोठे योगदान राहिलेले जवळा गावचे सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रशांत शिंदे व सुभाष शिंदे यांचे वडील व सरपंच सौ वैशाली सुभाष शिंदे यांचे सासरे मारूती (भाऊसाहेब) शिंदे यांचे नुकतेच आज दि ८ सप्टेंबर रोजी पहाटे नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने जवळा परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्वर्गीय मारूती (भाऊसाहेब) शिंदे हे रयत शिक्षण संस्थेत काम करतानाच,त्यांचे सामाजिक क्षेत्रातही महत्वाचे योगदान राहिले. शिंदे भाऊसाहेबांनी श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात वर्ग खोल्या बांधकाम करण्याबरोबरच, १२ वी पर्यंत उच्च माध्यमिक विद्यालय सूरू करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले.समाजातील गोरगरीब मुलींचे विवाह लावून,त्यांचा संसार उभा करण्यात भाऊसाहेबांचा मोठा वाटा राहिला.

सन १९९६ साली ग्रामदैवत श्री जवळेश्वर मंदिराचे शिखरबांधकाम करण्यासाठी भाऊसाहेबांनी पुढाकार घेतला. जवळा ग्रामपंचायत, जवळा सेवा सोसायटी या संस्थावर काम करताना भाऊसाहेबांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. भाऊसाहेबांचा राजकीय प्रवास तत्कालिन आमदार सदाशिव लोखंडे यांच्यासोबत भाजपामधून झाला. पुढे काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना भाऊसाहेबांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. सर्वांना बरोबर घेण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते सर्वांनाच आपलेसे राहिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते यांचे ते वडील होते तर त्यांची सुन वैशाली सुभाष शिंदे या सध्या जवळा गावच्या सरपंच आहेत. राजकीय क्षेत्रात आसताना त्यांनी जिल्हा परिषद निवडणुक लढवली होती. तसेच जवळा सोसायटीवर संचालक व जवळा ग्रामपंचायतीमध्ये सदस्य देखील होते. त्यांच्या निधनाने जवळा गावासह जामखेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here