न्यू इंग्लिश स्कूल पाटोदा ( गरडाचे ) येथे शिक्षक दिन साजरा
जामखेड प्रतिनिधी
पाटोदा (गरडाचे) येथील कर्तव्यदक्ष माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गफ्फारभाई पठाण म्हणाले, चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा,सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे.समाजाचा विकास सत्तेने होत नाही,यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो. ज्या देशामध्ये शिक्षकाला सर्वत्र मान व प्रतिष्ठा असते. समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे. तसेच सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
शाळेतील विद्यार्थ्यींनीची भाषणे झाली.
याप्रसंगी मुख्याध्यापक मा. तोरडमल,मा. खंडागळे बी. के., श्रीम.पोंदे व्ही.एस.,श्रीम. अनारसे व्ही. व्ही.,श्रीम.बनकर सी. बी., श्रीम.पाटील यु.एस., मा. वस्तारे एस. एस., मा.मार्कंडे एस. एम., मा.शिंदे ए. के., मा.जमदाडे आर.पी., मा. भैलुमे सी. झेड तसेच विश्वनाथ मोरे, सोहेल सय्यद, प्रकाश कडू पाटील,रौफ पठाण,सिद्दिक शेख,रमजान सय्यद,जिबरान शेख, सुफियान पठाण,सादत पठाण,साहिल पठाण,अर्शद पठाण,अरबाज पठाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीम. व्ही.एस.पोंदे तर आभार श्रीम.पाटील यु.एस यांनी मानले.