जामखेड प्रतिनिधी

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती दरवर्षी संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनीही कोरोनानंतरची पहिली निर्बंधमुक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती अगदी उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्याचे ठरवून त्यानुसार चौंडी येथे जोरदार तयारी करून त्या ठिकाणी महाराष्ट्रातील दिग्गज नेते, मंत्री आणि सर्वपक्षीय आमदार व नेत्यांना स्वतः आमदार रोहित पवार यांनी निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे चौंडी येथिल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन आ. रोहित पवार यांनी केले आहे.

ADVERTISEMENT

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब हे देखील उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात चौंडी येथे पार पडणार आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ विकासाचा विडा आमदार रोहित पवार यांनी उचलला आणि जन्मस्थळ परिसरात सुशोभीकरण तसेच या ठिकाणच्या पर्यटनवाढीसाठी त्यांनी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी देखील मंजूर करून आणला.

ADVERTISEMENT

यंदाच्या वर्षी निर्बंधमुक्त जयंती साजरी होत असताना त्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारचे दिग्गज नेते आणि राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाची नक्कीच शोभा वाढणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे आणि या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे. या कार्यक्रमस्थळी गेल्या आठवडाभरापेक्षा जास्त काळापासून जय्यत तयारी सुरू होती. अखेर तो दिवस येऊन ठेपला असून सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतलेला जयंती उत्सव 31 मे रोजी चौंडी येथे जल्लोषात साजरा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here