जामखेड प्रतिनिधी
समृद्ध गाव संकल्प 2.0 चा शुभारंभ म्हणून 28 गावांमध्ये उद्या (2 एप्रिल रोजी) श्रमदानाची गुढी उभारली जाणार आहे. यात कर्जत येथील 14 व जामखेड मधील 14 गावांचा समावेश आहे. आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मागील 2 वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघात समृद्ध गाव संकल्पना राबवली जात आहे. आध्यत्मिक, शिक्षण, महिला व बालविकास, जल संधारण, वृक्ष लागवड, मूलभूत सुविधा, आरोग्य अशा 7 विषयांवर लोक सहभाग आणि प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने ग्राम समृध्दी चा संकल्प पुढे नेला जात आहे!
गुढी पाडव्याचे औचित्य साधून, समृद्ध गाव संकल्प 2.0 मधील बारामती मध्ये साडेतीन दिवसीय ट्रेनिंग घेतलेले 28 गावं यात सहभागी होणार आहेत. गावकऱ्यांनी एकत्र येऊन जिथे श्रमदान करायचे तिथे गुढी उभारायची. या गुढीला गावात समृद्धी नांदू दे ही प्रार्थना करत श्रमदानाला सुरूवात करत पुढील वर्षभर हा उपक्रम गावात राबवतात. मागील वर्षी याचं माध्यमातून, अनेक गावांनी उत्कृष्ट काम केली. ही 28 गाव, ही याच प्रकारे उत्कृष्ट कार्य करून गाव समृद्ध करतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या 28 गावांतील श्रमदानाच्या गुढीचे पूजन, राजेंद्र पवार, सुनंदा पवार, व प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी गुढीपाडवा दिनी करणार आहेत. या गावांनी घेतलाय समृद्ध गाव संकल्प 2.0 मध्ये जामखेड तालुक्यातील डोणगाव, पाडळी, मोहा, कोल्हेवाडी, नाहुली, देवदैठण, राजुरी, पिंपळगाव आळवा, लोणी, वाकी, जातेगाव, दिघोळ, मुंगेवाडी, जायभाय वाडी. तर कर्जत तालुक्यातील भांबोरा, दगडी बारडगाव, बेनवडी, कोळवडी, वडगाव तनपुरा, कोपर्डी, भोसे, खांडवी, चांदे बुद्रुक, कोंभळी, घुमरी, टाकळी खांडेश्वरी, आखोनी, डोबाळवाडी या गावांचा सहभाग आहे.