कुसडगाव येथे जनावरावर वन्यप्राण्याचा हल्ला

हल्ल्यात जनावर जखमी

जामखेड प्रतिनिधी

आष्टी तालुक्यात बिबट्याने तीन जणांचा बळी घेतला आसल्याने शेजारील जामखेड तालुक्यात देखील या बिबट्याची धास्ती नागरिकांनी घेतली आहे. त्यातच तालुक्यातील कुसडगाव येथे लक्ष्मण कात्रजकर या शेतकर्‍यांच्या वस्तीवरील जनावरावर वन्यप्राण्याने हल्ला केला आसल्याने नेमका हा हल्ला बिबट्याने केला आहे का याचा तपास वनविभाग करत आहे.

कुसडगाव येथील लक्ष्मन कात्रजकर यांच्या वस्तीवर २९ रोजी मध्यरात्री एका वन्यप्राण्याने त्यांची जनावरे बांधली होती त्या ठिकाणी येऊन अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या जनावराच्या कानाला मोठी दुखापत झाली आहे. सदरचा हल्ला बिबट्यानेच केला आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे त्यामुळे कुसडगाव परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे. या बाबत ची माहीती कुसडगाव चे पोलीस पाटील यांनी जामखेड चे वनरक्षक गांगुर्डे यांना माहिती दिली असुन त्या नुसार हल्ला कोणत्या प्राण्याने केला याचा तपास वनविभाग करीत आहे. मात्र हा हल्ला तरसाने केला आसल्याचा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. मात्र नागरीकांनी आपली काळजी घ्यावी असे अवहान कुसडगाव चे सरपंच हवा सरनोबत यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here