जामखेड प्रतिनिधी
तरुण पिढीमध्ये शारीरिक व मानसिक आरोग्य वाढावे व तरुणांमध्ये खेळांविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने जामखेड येथे नुकत्याच माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
स्पर्धेचे उद्घाटन श्री अरुण मुंढे जिल्हाध्यक्ष अ.नगर यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. स्पर्धेकरिता महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते. माजी मंत्री, प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा, जामखेड तालुकाध्यक्ष शरद कार्ले यांच्यावतीने करण्यात आले होते. स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे संघ उपस्थित होते तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते विकास काळे यांनी देखील त्यांच्या संघासोबत या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. शेवटच्या अटातटीच्या लढतीमधे महासंग्राम युवा मंच पुणे विरुद्ध जय हनुमान क्रीडा मंडळ, महासांगवी ता.पाटोदा यांच्यामधे झाली. सामना बराबरी मध्ये सुटला. त्यानंतर पाच-पाच रेड करून हा सामना महासांगवी संघाने 4-0 गुणांनी जिंकला. या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांक विजेत्यास रोख रक्कम 41 हजार रुपये राम शिंदे मित्र मंडळ, चौंडी यांच्या कडून जय हनुमान क्रिडा मंडळ यांना, द्वीतीय क्रमांक आजिनाथ हजारे ज्योती क्रांती पतसंस्थेचे संचालक यांच्याकडून महासंग्राम युवा मंच,पुणे तृतीय क्रमांक श्री.गौतम (आण्णा) उतेकर यांच्याकडून धस अण्णा स्पोर्ट क्लब आष्टी व चतुर्थ पारितोषिक जि.प.सदस्य अनिल लोखंडे यांच्याकडून चेतक स्पोर्ट अकॅडमी,बालेवाडी पुणे यांनी पटकावले.
तरुण पिढीमध्ये शारीरिक व मानसिक आरोग्य वाढावे व तरुणांमध्ये खेळांविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने स्पर्धेचे आयोजन पैलवान शरद कार्ले यांनी केले होते, स्वतः एक पैलवान असल्यामुळे त्यांना खेळाची आवड असून त्यांनी अशा अशा प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेकरिता पंच म्हणून माने सर, जगदाळे सर, उबाळे सर, सुपेकर सर यांनी न्यायदानाचे काम चोख पार पाडले, तसेच राजेंद्र सोनवलकर यांनी उत्कृष्ट निवेदन करून प्रेक्षकांची मने जिंकली. जामखेड तसेच परिसरातील कबड्डी प्रेमींनी या स्पर्धेचा मनसोक्त आनंद लुटला या स्पर्धेकरिता उपस्थित जिल्हा संघटन सरचिटणीस दिलीप भालसिंग, सहसरचिटणीस बाळासाहेब महाडिक, मा.माऊली आप्पा जरांगे (जि.प सदस्य बीड), अ.सं.प्रदेश उपाध्यक्ष सलीम बागवान, तालुकाध्यक्ष अजय काशिद, जि.प सदस्य सोमनाथ पाचरने, पं.स. सदस्य रवी सुरवसे भाजपा युवा कार्यकर्ते व सर्व पदाधिकरी मोठ्या संखेने उपस्तीत होते.