जामखेड प्रतिनिधी
पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी जामखेड येथे दि २६ नोव्हेंबर संविधान दिन संस्थेचे प्राचार्य प्रा.विकी धर्मेंद्र घायतडक सर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय घटनेच्या प्रस्तावणेचे पूजन करून साजरा करण्यात आला.यावेळी 26/11 रोजी झालेल्या भ्याड हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.
यावेळी प्रा.विकी घायतडक सर म्हणाले की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार,स्त्रीयांना आपले कर्तृत्व दाखवण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त संविधानामुळे मिळाला आहे.
सदरील कार्यक्रमासाठी संगणक अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा.रणजीत भालशंकर सर, स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. किशोर हुंबे , प्रा.अपर्णा मुरूमकर, प्रा.अस्मिता साळवे, कार्यालयीन अधीक्षक संतोष डहाळे, संतोष जगताप सर, विक्रम कुटे सर, वैशाली कामे -परदेशी मॅडम, विवेक ढवळे इ.मान्यवर उपस्थित होते.






