जामखेड प्रतिनिधी

सरकारने सौर उर्जाला प्रााधान्य दिले असूून डिझेल व पेट्रोलमुळे परकीय गंगाजळवर मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे तसेच प्रदुषणामुळे पर्यावरणाचा होणारा -हास टाळण्यासाठी केंद्र सरकारने ई व्हेकलला प्राधान्य दिले असून अगामी पाच वर्षांत जवळपास ७० टक्के सर्व प्रकारचे वाहने इ व्हेकल मध्ये समाविष्ट होईल असा विश्वास टुनवाल इ बाईकचे अध्यक्ष जुमरमल टुनवाल पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

टुनवाल इ बाईकचे अध्यक्ष जुमरमल टुनवाल यांनी महाराष्ट्राचे टुनवाल ई बाईकचे डिलर एच यु गुगळे यांच्या शोरूमला भेट दिली. यावेळी एच.यु गुगळे उद्योग समुहाचे रमेशभाऊ गुगळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी एच.यु गुगळे पतसंस्थेचे व्यवस्थापक वैभव कुलकर्णी, उपव्यवस्थापक जुबेर पठाण, कृषीभूषण रवींद्र कडलग, एल एल पी चे व्यवस्थापक कथोरीया साहेब, एच यु गुगळे बाईकचे मॅनेजर विजय धुमाळ सह आदी उपस्थित होते.
उद्योजक जुमरमल टुनवाल यांनी एच यु गुगळे उद्योग समूहाच्या बायोटेक कंपनीला भेट देऊन केळी, डाळींब, बांबू व इतर विविध प्रकारच्या टिश्यू कल्चर प्लॉंटची पाहणी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, एच यु गुगळे उद्योग समूहाचे रमेशभाऊ गुगळे यांनी उद्योग व्यवसाय बरोबर सामाजिक बांधिलकी जपली आहे. डिझेल पेट्रोलवर होणारा खर्च टाळण्या साठी व पर्यावरणाचा -हास रोखण्यासाठी त्यांनी ई बाईक क्षेत्रात पाऊल ठेवून जामखेड करांना वेगळा संदेश दिला आहे. एच. यु गुगळे उद्योग पतसंस्थेने महिला सक्षमीकरण करण्यासाठी पाऊल उचलले असून जवळपास अडीच हजार महिला बचतगटांना कर्ज देऊन त्यांना स्वावलंबी बनवले आहे. ग्रामीण भागात टिश्यू कल्चर प्लॉंट उभारला या व्यवसायात ९० टक्के धोका आहे तरी हा उद्योग स्विकारून गुगळे समुहाने तो यशस्वी करून दाखवला. गुगळे उद्योग समुह हा जामखेड करांसाठी एक मिनी एमआयडीसी असल्याचे उद्योजक टुनवाल यांनी सांगितले.
टुनवाल यांनी पुढील महिन्यात आपण बाईक बाजारात आणणार आहे. प्रती किलो मीटर ६० पैसे खर्च ग्राहकांचे होणार आहे तसेच पुढील सहा महिन्यात चारचाकी वाहन कंपनी बाजारात आणणार आहे त्यामुळे तीन लाख रोजगार निर्मिती होईल असे सांगून येथून पुढे या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर स्पर्धा होणार आहे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपनी सर्व तो परी प्रयत्न करणार आहे.
एच यु गुगळे उद्योग समुहाचे रमेशभाऊ गुगळे यांनी टुनवाल बाईकचे अध्यक्ष जुमरमल टुनवाल यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. उद्योजक टुनवाल यांनी शोरूमला व बायोटेक कंपनीला भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. कृषीभूषण रवींद्र कडलग यांनी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here