Home ताज्या बातम्या लग्न आमचं, मुलं आम्हाला झाली आणि लाडू भलतेच वाटताय; महामार्गाच्या श्रेयावरुन नितीन...
लग्न आमचं, मुलं आम्हाला झाली आणि लाडू भलतेच वाटताय; महामार्गाच्या श्रेयावरुन नितीन गडकरी यांचा रोहित पवारांना टोला
कर्जत प्रतिनिधी
नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे श्रेय रोहित पवार घेत असल्याने गडकरी यांनी रोहित पवारांवर निशाणा साधत हा अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. लग्न आमचं, मुलं आम्हाला झाली आणि लाडू भलतेच वाटताय; महामार्गाच्या श्रेयावरुन नितीन गडकरी यांचा रोहित पवारांना टोला लावला.
कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये शरद पवारांचे नातू रोहित पवारांविरोधात भाजपचे राम शिंदे रिंगणात आहे. दरम्यान, राम शिंदे यांच्या प्रचार सभेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष उपस्थिती लावली होती. यावेळी नितीन गडकरी यांनी सभेत बोलताना रोहित पवारांना जोरदार टोला लगावला. लग्न आमचं झालं, मुलं आम्हाला झाली आणि लाडू भलतेच वाटू राहिले. म्हणजे मी मंत्री, रस्ते मी केले, आमच्या पक्षाच्या राम शिंदे, आम्ही काम केलं आणि गावात भलतेचं लोक लाडू वाटू राहिले. अस म्हणत गडकरी यांनी रोहित पवारांना टोला लागवला आहे. नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे श्रेय रोहित पवार घेत असल्याने गडकरी यांनी रोहित पवारांवर निशाणा साधत हा अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
ज्यावेळी विकासाच्या कामावर मत मागता येत नाहीत, तेव्हा जनतेच्या मनात विष घालवण्याचा प्रयत्न होतो. मागच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला गेला की, भारतीय जनता पार्टीला 400 जागा मिळाल्या तर बाबासाहेबांचे संविधान बदलणार. मात्र आम्ही बाबासाहेबांचे संविधान बदलणार नाही, कुणाला बदलू ही देणार नाही आणि कुणाचे बदलवण्याची हिंमत देखील नाही, असं म्हणत भाजप नेते नितीन गडकरी यांनी विरोधकांवरती तोफ डागली. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ मिरजगाव येथे आयोजित प्रचार सभेत नितीन गडकरी बोलत होते.
error: Content is protected !!