जामखेड़ प्रतिनिधी 

तालुक्यातील नान्नज येथे ग्रामपंचायतीतर्फे डॉ. विट्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळदघाट येथील कृषिदूताचे ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमासाठी आलेल्या कृषिदुताचे नान्नज ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

कृषिदूत शहारुख लियाकत शेख याने गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थांना भेटून त्यांच्याशी संवाद साधुन त्यांच्याकडून गावाविषयी माहिती संकलित केली. गावातील अनेक समस्यांवर चर्चा केली. कोव्हिड – १९ च्या प्रादुर्भाव व त्यासाठी लोकांमध्ये जागृती होण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. या कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत शेतातील माती परीक्षण, फळबाग लागवड, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, बीज प्रक्रिया, शेतातील अवजारांचा वापर, शेतीचे व आर्थिक नियोजन, जनावरांचे लसीकरण आदी विषयांवर गावकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. तसेच विविध विषयांची प्रात्यक्षिके आयोजित करून आधुनिक तंत्राविषयी जनजागृती केली जाणार आहे. कृषिदूताला महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे, उपप्राचार्य एच. एल. शिरसाठ, डॉ. व्ही. एस. निकम, कार्यक्रम समन्वयक प्रा. के. एस. दांगडे, डॉ. एस. बी. राउत, व इतर विषयतज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे कृषिदूत शहारुख शेख याने सांगितले यावेळी सरपंच प्रभावती मोहळकर, सरपंच जालिंदर खोटे ,ग्रामविकास अधिकारी रफिक शेख ,ग्रामपंचायत सदस्य लियाकत शेख, भाऊसाहेब मोहळकर, हरिश्चंद्र मोहळकर, यांच्यासह ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here