जामखेड प्रतिनिधी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी प्रशासन व सामाजिक संस्थांकडून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत.त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेमार्फत एक अनोखा उपक्रम राबविला आहे.या संस्थेमार्फत युरेका फोरब्ज या नामांकित कंपनीकडून कोरोनाचा विषाणू निष्क्रिय करणारे कोरोना गार्ड हे विकसित करण्यात आलेले यंत्र शासकीय कार्यालयांना भेट देऊन कार्यान्वित करण्यात आले आहेत.

रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेमार्फत संस्थेच्या नर्सिंग,फार्मसी व होमिओपॅथीक महाविद्यालयाच्या शैक्षणिक संकुलासह तहसील कार्यालय जामखेड, पोलिस स्टेशन जामखेड व ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे युरेका फोरब्ज या नामांकित कंपनीचे कोरोना गार्ड यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार श्री. विशाल नाईकवाडे संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे, सचिव डॉ.वर्षां मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनिल बोराडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे, सलिम बागवान, शरद ढवळे, विशाल गर्जे, राहुल उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

तालुक्यातील तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन, लसीकरण केंद्र अशा सरकारी कार्यालयांमध्ये हे यंत्र बसवण्यात आले आहे. या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे या यंत्राच्या 1000 स्क्वेअर फुट परिसरातील कोरणाचे विषाणू निष्क्रिय करण्याचे काम हे यंत्र करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here