Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्स ची स्थापन

जामखेडमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्स ची स्थापन

जामखेड प्रतिनिधी

तालुक्यात संभाव्य म्युकर मायकोसीस,तसेच लहान मुलांना होणारा करोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी ११ खाजगी डॉक्टर्स व दोन आरोग्य यंत्रणेतील अधिकारी यांचा समावेश असलेला टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.

तालुक्यात संभाव्य म्युकर मायकोसीस,व करोना संसर्गाच्या लहान मुलांमध्ये होणार्‍या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांच्या विशेष कार्यदल (टास्क फोर्स) तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये ११ तज्ज्ञ खाजगी डॉक्टर सदस्य असून वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी स त्याचे सदस्य सचिव असणार आहेत .सध्या करोनाची दुसरी लाट सुरू आहे. करोना विषाणूमध्ये होणारे जनुकीय बदल आणि उत्परिवर्तनामुळे संभावित म्युकर मायकोसीस व तिसरी लाट आल्यास त्यामध्ये लहान मुलांना करोना संसर्गाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे यावर नियंत्रण व निदान,उपचार व मार्गदर्शन करण्यासाठी हि टाक्स फोर्स स्थापन करण्यात आली आहे म्युकर मायकोसीस टास्क फोर्समध्ये अध्यक्ष म्हणून नेत्रतञ डॉ. गणेश झगडे, तर सदस्यपदी डॉ अविनाश मुंडे, डॉ रोहन टोमके, डॉ सुरज तौर, डॉ आनंद लोंढे, डॉ राजकुमार गायकवाड, डॉ सागर शिंदे सचिव म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ असणार असून बालरोग टास्क फोर्समध्ये अध्यक्ष बालरोग तज्ञ डॉ विकास शिंदे, तर सदस्य म्हणून डॉ प्रताप चौरे, डॉ सुहास सूर्यवंशी, डॉ महेश गोडगे सचिव म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे हे असणार आहेत.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!