

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कॅन्सर विरोधी HPV लसीकरण मोहीम.
जास्तीत जास्त युवतींनी या मोहीमेचा लाभ घ्यावा; ॲड. संध्याताई सोनवणे
मंबई: र्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. हा महिलांमध्ये आढळणारा दुसरा सर्वात गंभीर कर्करोग आहे. याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कॅन्सर विरोधी HPV लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त युवतींनी या मोहीमेचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षा ॲड. संध्याताई सोनवणे यांनी केले आहे.

महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त प्रदेशाध्यक्षा ॲड. संध्याताई सोनवणे यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश आयोजित कॅन्सर विरोधी मोफत HPV लसीकरण मोहीम दि. ६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वा. मंबई येथील महिला विकास मंडळ, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मंत्रालय जवळ, मुंबई – 400 021 या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या लसीकरणामुळे युवतींना खालील प्रमाणे फायदे होणार आहे.

HPV विषाणूजन्य कॅन्सर संसर्गापासून पुर्णपणे संरक्षण मिळते. गर्भाशयाच्या मुखाचा (सर्व्हायकल) कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. तसेच लसीकरणामुळे कर्करोगावरील उपचार खर्च व वेदना टाळता येतात. युवतींच्या कुटुंबासाठी मानसिक समाधान आणि सुरक्षितता मिळते. केवळ एक लस घेऊन जीवनभर आरोग्याची हमी देण्यात येत आहे. पूर्णपणे सुरक्षित व शास्त्रीयदृष्ट्या मान्यताप्राप्त लस आसुन युवतींच्या निरोगी भविष्यासाठीच्या अत्यंत संवेदनशील उपक्रम राबविण्यात येत असून जास्तीत जास्त युवतींनी या लसीकरण मोहीमेत सहभागी होवून सहकार्य करण्याचे आवाहन ॲड. संध्याताई सोनवणे यांनी केले आहे.







