
वंजारवाडी/धानोरा ग्रामपंचायतीत सरपंच, ग्रामसेवक यांनी संगनमताने तांडावस्तीचा नीधी दुसरीकडे वळविला.
सामाजिक कार्यकर्ते महादेव ओंबासे यांनी केली प्रशासनाकडे तक्रार दाखल!
जामखेड प्रतिनिधी
धानोरा ग्रामपंचायत अंतर्गत वंजारवाडी गावातील तांडा वस्त्यांसाठी वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेचा तीन तांडा वस्त्यांसाठी प्रत्येकी १० लाख रूपये प्रमाणे नीधीला शासनाकडुन मंजुरी मिळाली. परंतु ग्रामसेवक व सरपंच यांनी ठेकेदाराला हाताशी धरून वस्तीवरील नागरीकांची दिशाभुल करत हा नीधी दुसरीकडे वळविला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते महादेव ओंबासे यांनी केली प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.
धानोरा ग्रामपंचायत अंतर्गत वंजारवाडी गावातील तांडा वस्त्यांसाठी वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेचा तीन तांडा वस्त्यांसाठी प्रत्येकी १० लाख रूपये प्रमाणे नीधीला शासनाकडुन मंजुरी मिळाली, ग्रामपंचायतीकडुन कामाचे टेंडरही करण्यात आले ईस्टिमेटप्रमाणे प्रत्येक तांडा वस्तीवर प्रत्येकी दहा प्रमाणे ३० सौरपथदिवे बसविणे अपेक्षित होते परंतु ग्रामसेवक व सरपंच यांनी ठेकेदाराला हाताशी धरून वस्तीवरील नागरीकांची दिशाभुल करत सुरवातीला इस्टिमेटप्रमाणे २४ सौर पथदिवे असल्याचं सांगितले, तांडा वस्तीवरील ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही इस्टिमेट देण्यास टाळाटाळ केली गेली,
गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार झाल्यानंतर ग्रामसेवक यांनी ईस्टिमेट दिले त्यामध्ये प्रत्येक वस्तीवर दहा सौर पथदिवे असल्याचे कळाले, काम चुकीचे झाल असल्याचे लक्षात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते महादेव ओंबासे यांनी जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली असता गटविकास अधिकारी यांनी धानोरा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना प्रत्यक्षपणे कामाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले, ग्रामसेवक यांनी पाहणी केली असता ओंबासे देडे वस्तीवर दहा सौर पथदिवे मंजुर असताना फक्त एकच सौरपथदिवा बसविल्याचे दिसुन आले, ठेकेदारास फोन करून विचारले असता ठेकेदाराने ३० पैकी २७ सौर पथदिवे बसविले असल्याचे सांगितले, पण प्रत्यक्षात मात्र ओंबासे देढे वस्तीवर नऊ पथदिवे कमी बसविले असल्याचे लक्षात आल्याने ग्रामसेवक यांनी पंचनामा करून तसा अहवाल गटविकास अधिकारी यांना दिला आहे. सदर तांडा वस्तीवरील कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते महादेव ओंबासे यांनी जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
तसेच ओंबासे देडे तांडा वस्तीवर बसविण्यात आलेला एक सौर पथदिवाही ईस्टिमेट रकमेच्या तुलनेत अत्यंत कमी किमतीचे साहित्य वापरून बसविला असल्याचं तक्रारदाराच म्हणनं असुन त्याचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे,
लवकरात लवकर सबंधितांवर कारवाई न झाल्यास तांडा वस्तीवरील नागरीक हे जिल्हा परिषद कार्यालय येथे आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
चौकट
सर्वसामान्य जनतेच्या सुखसुविधांसाठी आलेल्या निधीचा योग्य वापर करणे ही ग्रामपंचायतीची प्रमुख जबाबदारी आहे, जनतेच्या नीधीची जर कोणी अशी विल्हेवाट लावत असेल तर संबंधितांवर कारवाई झालीच पाहीजे
—मा,महादेव ओंबासे
(सामाजिक कार्यकर्ते)