एन एम एम एस परीक्षेत नागेश विद्यालयाचे घवघवीत यश, नागेश विद्यालयाचे सतरा विद्यार्थी 100 गुणांच्यापुढे
जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा( एन एम एम एस ) 2024 या परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत नागेश विद्यालयाचे 54 विद्यार्थी पास झाले असून 100 गुणांच्या वर 17 विद्यार्थी आहेत. विद्यालयाचा 68% शेकडा निकाल लागला आहे. या यशस्वी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
एन एम एम एस विभाग प्रमुख- सोमीनाथ गर्जे,समाजशास्त्र – ज्ञानेश्वर लटपटे, गणित – अशोक चौधरे, सामान्य विज्ञान – प्राचार्य मडके बी के व सपना ढाकणे, बुद्धिमत्ता – सोमीनाथ गर्जे, वर्गशिक्षक -संतोष पवार, गुरुकुल प्रमुख – संतोष ससाने, पर्यवेक्षक- विकास कोकाटे, या सर्व मार्गदर्शक करणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती प्राचार्य मडके बी के, आर टी एस-ओलंपियाड बाह्य परीक्षक उदयकुमार सांगळे( सातारा ), पर्यवेक्षक विकास कोकाटे, गुरुकुल प्रमुख संतोष, एनसीसी प्रमुख मयूर भोसले सर रघुनाथ मोहोळकर, साळुंखे बी एस, संभाजी इंगळे, गोपाळ बाबर, संभाजी देशमुख, शंकर गुट्टे कृष्णा मुरकुटे, संतोष पावर, ज्ञानेश्वर शेटे, ज्योती गोपाळघरे, मनीषा म्हस्के, पालकर ज्योती, विजया आजबे, निलेश अनारसे, शशिकांत रणदिवे, शिंदे बी एस, बाळासाहेब डाडर, अशोक सांगळे, अजहर पठाण, सुहास जाधव, आदी मान्यवर शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
या यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे आमदार रोहित दादा पवार,उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे ,सहायक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे व बाबासाहेब नाईकवाडी, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्रजी कोठारी, हरिभाऊ बेलेकर, विनायक राऊत व सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.