लेखी आश्वासनानंतर जामखेड उर्दू शाळा कृती समितीचे उपोषण मागे.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू येथील सिटीसर्वे नंबर 1150 च्या जागेत बांधकाम खात्याने मधोमध बेकायदेशीर विनाकारण एक भिंत टाकली आहे. याची काही गरज नाही ती भिंत काढण्यात यावी तसेच जामखेड नगर परिषदेकडून जामखेड नवीन पारुप विकास आराखडा आरक्षण नुसार उर्दू शाळेवर रस्ता वाढीवकरण व पोलीस स्टेशन साठी आरक्षित करून उर्दू शाळा व शाळेची जागा ही संपुष्टात आणली जात आहे, तरी उर्दू शाळाच्या जागेवरील प्रारुप् विकास आराखडा आरक्षण रद्द करण्यात यावे. याप्रमुख मागण्यासाठी 4 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयासमोर उर्दू शाळा बचाव कृती समिती तर्फे उपोषण करण्यात आले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण सायंकाळी उशिरा मागे घेण्यात आले.
जामखेड शहरात मुख्य चौकात असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू शाळेचा सिटीसर्वे क्रमांक 1150 च्या जागेमध्ये बांधकाम खात्याने मधोमध बेकायदेशीर विनाकारण भिंत टाकली आहे. याची काही गरज नाही ती भिंत काढण्याचे आदेश व्हावेत. तसेच जामखेड नगर परिषदे कडून जामखेड नवीन प्रारूप विकास आराखडा आरक्षणा नुसार उर्दू शाळेवर रस्ता वाढीविकरण व पोलीस स्टेशनसाठी आरक्षित करून उर्दू शाळा व शाळेची जागा ही संपुष्टात आणली जात आहे तरी उर्दू शाळेच्या जागेवरील प्रारुप विकास आराखडा आरक्षण रद्द करण्यात यावा. तसेच सण 1970 पासून आज पर्यंत जामखेड शहराचा सिटीसर्वे करण्यात आलेला नाही म्हणून नगर परिषदेमार्फत संपूर्ण जामखेड शहराचा सिटीसर्वे करण्यात यावा त्यासाठी तात्काळ जामखेड नगर परिषदेने जिल्हाधिकारी यांच्याकडे जामखेड शहराचा सिटीसर्वे करण्याचा प्रस्ताव सादर करावा.
तसेच बी ओ टी तत्त्वावर उर्दू शाळेचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव व प्रक्रिया रद्द करण्यात यावी. तसेच जामखेड येथील पहिली ते आठवीपर्यंत उर्दू प्राथमिक शिक्षण आहे परंतु पुढील शिक्षण नववी ते दहावी साठी अत्यंत गरजेचे व जिव्हाळ्याची बाब आहे त्याकरता अँग्लो उर्दू स्कूल साठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात यावी वरील सर्व मागण्या रास्त व कायदेशीर असल्याने शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोंबर रोजी तहसील कार्यालय समोर उर्दू शाळा बचाव कृती समितीतर्फे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार गणेश माळी, मुख्याधिकारी अजय साळवे, पंचायत समिती बांधकाम विभागाचे बागुल, राष्ट्रीय महामार्गाच्या कनिष्ठ अभियंता रेहना इनामदार, एल ए घटमल, कुंभार ए वाय उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी अधिकारी व आंदोलन करते यांच्यामधील मध्यस्थीची भूमिका उत्तम निभावली, उर्दू शाळा कृती समितीचे अध्यक्ष हाजी जावेद अली सय्यद, मेजर मुस्तफा शेख, मौलाना खलील, हाफिज मुजाहिद, मुक्ती अलीम साहब, सोहेल काझी, हाजी नादीर नालबंद उर्दू शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इरफान सय्यद, बाबाभाई शेख, युसुफ शहा, आसिफ शेख, इब्राहिम शेख, शरीफ तांबोळी, लियाकत शेख, असद बारूद, वसीम शेख, जैद खान ऍडव्होकेट जैद खान, इमरान सर, हाजी मंजूर सय्यद, मोहसीन शेख, राजू सय्यद यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here