कै. विष्णू उस्ताद आखाडा ठरतोय नागपंचमीची ओळख बदलवणारा महाराष्ट्रातील आखाडा.
उद्या जामखेड शहरात रंगणार भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान
जामखेड प्रतिनिधी
जामखेडची पंचमी म्हणल की भल्या भल्याना भुरळ घालतो तो घुंगरांचा आवाज. अस म्हणल् जात की घुंगराचा आवाज आल्याशिवाय पाऊस ही पडत नाही, आणि अश्याच महाराष्ट्रात नावाजलेल्या जामखेडची नागपंचमी आता युवा पिढीतील एक आदर्श की ज्या युवा न आजची पिढी लाल मातिकडे कशी वळवता येईल यासाठी गेली 22 वर्ष प्रयत्न करत आहे तो युवा म्हणजे अजय विष्णू काशीद.
सालाबादप्रमाणे 22 व्या वर्षी ही जामखेड मधे नागपंचमी निमित भव्य दिव्य निकाली कुस्त्यांचे मैदान कै. विष्णू उस्ताद काशीद यांच्या स्मरणार्थ अजय (दादा) काशीद यांच्या पुढाकाराने मराठा गौरव युवराज (भाऊ) काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमहाराष्ट्र केसरी बबन (काका) काशीद यांच्या अनुभवतून हे मैदान शनिवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी जामखेड महविद्यालय जामखेड येथे संपन्न होत आहे.