अहमदनगर प्रतिनिधी (७ जून )
जगात अनेक क्रांत्या झाल्या. भारताला दीर्घ काळानंतर स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यापूर्वी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक ही भारतातील पहिली लोकशाही क्रांती होती.ज्यातून स्वातंत्र्य,समता व बंधुता हि तत्वे पुढे आली. व छत्रपती शिवाजी महाराज जगातील अनेक क्रांत्याचे प्रेरणा ठरले असे प्रतिपादन शिवचरित्राचे अभ्यासक गंगाधर बनबरे यांनी केले ते न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यभिषेक का करून घेतला ? याची मांडणी करताना हे राजांचे नव्हे तर रयतेचे राज्य करणे व सर्वांना स्वातंत्र्य,समता, न्याय बंधूतेच्या सूत्रात बांधणे हा उद्देश त्यामागे होता. प्रस्थापित धर्मव्यवस्थेची अनिष्ट बंधने झुगारून लावून सर्वांना समतेच्या सूत्रात बांधून जातीव्यवस्था, धर्मव्यवस्थेला त्यांनी आव्हान देण्यासाठी हा सोहळा केला.त्याच बरोबर स्त्रियांच्या मुक्तीचा प्रयत्न होता , धर्मव्यवस्थेने नाकालेल्या पैकी कुणी ही राजा होऊ शकतो. व राज्यव्यवस्था ही धर्मव्यवस्था व्यवस्थेवर अंकुश ठेवू शकते. हे तत्व यातून प्रस्थापित झाले. क्युबा, फ्रान्स व अनेक युरोपियन देशांच्या लोकशाही क्रांत्या झाल्या त्यांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज होते. हे त्यांनी अनेक उदाहरणासह स्पष्ट केले.
छत्रपती शिवरायांनी प्रत्यक्षात उतरवलेली स्वराज्याची संकल्पना ही शहाजीराजे व जिजाऊंची संकल्पना होती. महात्मा फुल्यांनी शिवजयंती सुरू करून हा प्रेरणास्त्रोत पुन्हा जागवला. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा मिळाली.असे हि त्यांनी सांगितले. अध्यक्षिय मनोगतात प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अहमदनगर शहराची असणाऱ्या ऐतिहासिक संबंधावर प्रकाश टाकत शिवरायांच्या इतिहासाची प्रेरणा घेऊन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज वाटचाल करत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात व्याख्यानापूर्वी संगीत विभागा हे विभागप्रमुख प्रा आदेश चव्हाण व विद्यार्थ्यांनी शिववंदन हा स्फूर्ती गीताचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमास न्यू लॉ कॉलेज चे प्राचार्य एम.एम.तांबे, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब सागडे विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.अनिल आठरे, इंजि.अभिजित वाघ,अशिफखान दुलेखान, सुरेश इथापे, यशवंत तोडमल, राजेंद्र कर्डीले तसेच सर्व प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते.या विशेष व्याख्यानाचे आयोजन विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.तसेच स्वागत व प्रस्ताविक उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी केले. सूत्र सूत्रसंचलन प्रा.प्राजक्ता ठुबे यांनी केले व आभार प्रा.गणेश निमसे यांनी मानले.





