


नवीन मराठी प्राथमिक शाळेत गुणवंतांचा गौरव
जामखेड प्रतिनिधी
नवीन मराठी प्राथमिक शाळेमध्ये नुकताच हेडगेवार, ऑलिम्पियाड आणि अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास जामखेड येथील एलआयसी (LIC) शाखेच्या मुख्य अधिकारी निशा सरकार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते यशाचे शिखर गाठलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे कोशाध्यक्ष उमेश देशमुख उपस्थित होते. व्यासपीठावर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी बोलताना निशा सरकार यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले.
सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांची नामावली:
इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड (Class Toppers):
५ वी: ऋग्वेद टेमकर, समृद्धी पोकळे, समर्थ आष्टेकर. ६ वी: आरती पोटे, प्रेम गायकवाड, दुर्वान्शी रोडे. ७ वी: अर्णव ढोले, अंकुर जाधव, भूमी घोलप. ८ वी: अथर्व शिरसाट.
अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा (इ. २ री):
शुभश्री जगदाळे, स्वामिनी मत्रे, दिव्यांका भोगे, साई टेकाळे, अमिना शेख, श्रवण पोटे, आरुषी गायकवाड, राव्या खैरे, सेजल यादव, सृष्टी टेकाळे, हर्षाली हुलगुंडे, कोणार्क दाणी, वेदांशी धुळे, मानसी लगड, साई फलके आणि विश्वजा काळे.
जिल्हा रँक (इ. ३ री ते ५ वी)
इ. ३ री: श्रावस्ती पटेकर, श्रीयोग जगताप, प्राजक्ता मते, लक्ष भंडारी, मधुरा गोरे, फातिमा सय्यद, नेत्री देशपांडे, श्रेयश बांगर, शिवनंदन लोखंडे, विश्वजीत मोहोळकर, शुभ्रा कुलकर्णी.
इ. ४ थी: राघवी काळे, स्वरा वाघमारे, प्रिती बोलभोट, कार्तिक मासाळकर, हर्षदा म्हेत्रे, सर्वज्ञा शिरगीरे, स्वरा सुपेकर, महारुद्र बेद्रे, धर्मराज शिंदे, वेदांग राजुरकर.

इ. ५ वी: स्नेहल गाडे, विराज जेधे, समर्थ आष्टेकर, स्वरूप कुलकर्णी, श्रुती मोरे, स्वराज मोरे, पार्श्व गांधी, पुरुषोत्तम जोशी, अथर्व दापेगावकर, समृद्धी पोकळे, सिद्धी मोराळे.
मंथन (इ. २ री) स्वामिनी मत्रे, शुभश्री जगदाळे, सेजल यादव, दिव्यांका भोगे, राव्या खैरे, आरुषी गायकवाड, हर्षाली हुलगुंडे, श्रवण पोटे.
हेडगेवार परीक्षा:
इ. ४ थी: स्वरा वाघमारे, महारुद्र बेद्रे, कार्तिक मासाळकर, राघवी काळे, सर्वज्ञा शिरागीरे.
इ. ५ वी: पार्श्व गांधी, स्वराज मोरे, विराज जेधे, पुरुषोत्तम जोशी, स्वरूप कुलकर्णी, संकेत गिते, समृद्धी गावडे, अमेय कुंभार, दर्शीत भालेकर, हमजा पठाण, विराज लव्हाळे.
इ. ७ वी:अंकुर जाधव आणि विराज बांगर. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढले असून, पालकांनीही शाळेच्या मेहनतीचे कौतुक केले.









