Home शैक्षणिक एन.एम.एम.एस.परीक्षेत कन्या विद्यालयाचे २३ विद्यार्थिनी शिष्यवृत्ती धारक

एन.एम.एम.एस.परीक्षेत कन्या विद्यालयाचे २३ विद्यार्थिनी शिष्यवृत्ती धारक

एन.एम.एम.एस.परीक्षेत कन्या विद्यालयाचे २३ विद्यार्थिनी शिष्यवृत्ती धारक

विद्यार्थिनी व शिक्षकांच्या मेहनतीला यशाची गवसणी

जामखेड प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय, जामखेडने राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS) उत्तुंग यश संपादन करून रयतच्या उत्तर विभागात द्वितीय क्रमांक तर अहिल्यानगर जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळविले आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्याया परीक्षेत विद्यालयाचे तब्बल २३ विद्यार्थिनी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, विद्यालयाने आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

कु. वेदिका दत्तात्रय घुमरे अहिल्यनगर जिल्ह्यात खुल्या प्रवर्गातून द्वितीय तर कु.यादव अनुजा भाऊसाहेब एस.टी. प्रवर्गातून द्वितीय आली आहे. विद्यालयाच्या गुणवंत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनीमध्ये घुमरे वेदिका दत्तात्रेय जिल्हात द्वितीय, शेख अलिझा अप्सर सांगळेत तेजश्री संदिपान, महानवर समृद्धी नवनाथ, उबाळे स्वरा माऊली, शेळके मुग्धा दीपक सय्यद सुमैया चाँद, सपकाळ संध्या शरद, रेळेकर आर्या भूषण, बांगर पायल नवनाथ, निकम तनया बाळकृष्ण, कदम सानिका संतोष, यादव अनुजा
भाऊसाहेब, लोखंडे नयना जीवन, सदाफुले प्रीती महेश, गर्जे तन्वी अविनाश, तुपेरे शरयू योगेश, कार्तिकी युवराज गंभीरे, दूर्वा चंद्रकांत भुजबळ, प्रांजली दीपक कांबळे, अनुराधा पिराजी टिकनूर, सलोनी सिद्धार्थ बुक्तर, प्रांजली सहदेव पवार या विद्यार्थींनींनी यश संपादन केले आहे.

शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षांत प्रत्येकी ४८००० रुपयेप्रमाणे, असे एकूण ११, ०४,००० रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार आहे. या यशामध्ये मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष योगदान राहिले. पवार व्ही. एस. (बुद्धिमत्ता विभाग प्रमुख), ठोंबरे आर. यू.(विज्ञान), सरकुंडे एन. बी. (सा. शास्त्रे) व श्री. नागरे एच. बी.(गणित) यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या यशामध्ये विद्यालयाच्या मुख्याध्यपिका श्रीम. भोर आर. आर. व पर्यवेक्षक हजारे एस. आर. यांचे उत्कृष्ट नियोजन लाभले.

या उल्लेखनीय यशाबद्दल चेअरमन , व्हा.चेअरमन, विभागीय अधिकारी , सहा. विभागीय अधिकारी, उत्तर विभाग अहिल्यानगर. स्कुल कमिटी सदस्य मधुकर राळेभात, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, व कुंडल राळेभात, श्रीम.भोर आर. आर. (मुख्याध्यापिका), हजारे एस. आर. (पर्यवेक्षक) तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य,स्थानिक स्कूल कमिटी, अध्यक्ष व सर्व सदस्यशाळा व्यवस्थापन समिती, अध्यक्ष व सर्व सदस्य सल्लागार समिती तसेच सर्वसेवक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!